देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार ‘कर्तव्य पथ’चे उद्घाटन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार ‘कर्तव्य पथ’चे उद्घाटन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. राजधानी दिल्लीत आज शानदार कार्यक्रम पार पडणार आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याचंही अनावरण यावेळी करण्यात येणार आहे. राजपथच नाव कर्तव्यपथ केले जाणार आहे. इंडिया गेट आणि कर्तव्यपथ पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेसाठी खुला होणार आहे. तब्बल 20 हजार कोटींच्या या भव्य प्रकल्पाचे उद्घाटन आज केले जाणार आहे. (prime minister narendra modi will inaugurate kartavya path at 7 pm on thursday)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 7 वाजता ‘कर्तव्य पथ’चे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदी यावेळी इंडिया गेट येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. NDMC ने गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडून ठराव मंजूर करून ‘राजपथ’ चे नाव बदलून ‘कर्तव्य पथ’ केले आहे. आता इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या संपूर्ण परिसराला ‘कर्तव्यपथ’ असे म्हटले जाणार आहे.

कर्तव्य पथ

 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान करणार आहेत. हा ग्रॅनाईटचा पुतळा नेताजींच्या स्वातंत्र्यलढ्यातील अतुलनीय योगदानासाठी श्रद्धांजली आहे असं मोदी म्हणाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा अरुण योगीराज यांनी तयार केला आहे, जे या वास्तूचे मुख्य शिल्पकार आहेत. 28 फूट उंच पुतळा एका मोनोलिथिक ग्रॅनाइट दगडात कोरलेला आहे आणि त्याचे वजन 65 मेट्रिक टन आहे.

पंतप्रधानांच्या आजच्या कार्यक्रमाची माहिती


हेही वाचा – 

First Published on: September 8, 2022 3:47 PM
Exit mobile version