नेहरूंच्या काळात कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीने अनेकांचे मृत्यू

नेहरूंच्या काळात कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीने अनेकांचे मृत्यू

Narendra Modi

पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही त्या काळात कुंभमेळ्याला भेट दिली होती. त्यावेळी सरकारने योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. त्यात अनेकांचा बळी गेला. मात्र पंडित नेहरूंनी त्या काळात ही बातमी माध्यमांसमोर येऊ दिली नाही, ही बातमी सरकारच्या दबावामुळे दडपली गेली. हे पाप नेहरुंनी पंतप्रधान असताना केले होते. त्याबाबत कुणीच काही बोलले नाही, बोलत नाहीत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. बुधवारी दरभंगा भागातील प्रचारसभेत मोदींनी हा गौप्यस्फोट केला.

मी अनेकदा कुंभमेळ्याला उपस्थित राहिलो आहे. त्या काळी आजच्या इतकी गर्दी किंवा लोकसंख्या नव्हती. नेहरुंच्या काळात जी दुर्घटना झाली, ती तत्कालीन काँग्रेस सरकार आणि नेत्यांकडून मागील पाच ते सहा दशके दडपली गेली. असेही मोदी म्हणाले. माध्यमांनीही ही मोठी बातमी दाखवण्याचे धाडस दाखवले नाही. काही वर्तमानपत्रांमध्ये याविषयी बातमी छापली गेली मात्र ती खूपच त्रोटक होती. या दुर्घटनेतील बळींना अद्याप आर्थिक मदत किंवा भरपाई मिळालेली नाही, असे पंतप्रधान म्हणाले. त्यावेळी सरकारी यंत्रणांकडून दाखवलेल्या असंवेदनशीलतेचा तो कळस होता, असा घणाघात मोदी यांनी केला.

First Published on: May 2, 2019 4:21 AM
Exit mobile version