पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका, आयएसआय आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका, आयएसआय आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानच्या आयएसआयच्या निशाण्यावर आहेत. गुप्तचर यंत्रणांनी कागदपत्र सादर करून याबाबत माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आत्मघाती हल्ला करण्याची व्यूहरचना आखली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्यासाठी लश्कर ए तोयबाचे दहशतवादी रॅली किंवा कोणत्याही रोड शोमध्ये घुसू शकतात असंही गुप्तचर यंत्रणांनी सांगितलं आहे. एका हिंदी वृत्त संकेतस्थळाने ही माहिती दिली आहे.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता आहे. दहशतवादी पोलिसांच्या वर्दीत येऊन मोदींच्या कार्यक्रम स्थळी आत्मघाती हल्ला करतील. काही दहशतवादी सुरक्षारक्षकांच्याही संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. पुढच्या महिन्यात नरेंद्र मोदी संपूर्ण आठवडाभर गुजरात, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांना मिळालेली ही माहिती गांभीर्याने घेतली जात आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

भारतातील मोठ्या नेत्यांना निशाणा बनवण्याचे आदेश आयएसआयने आपल्या दहशतवाद्यांना दिले आहेत. पोलिसांच्या वर्दीत येऊन दहशतवादी मोदींवर आत्मघाती हल्ला करू शकतील. गुप्तचर यंत्रणांनी लष्कर ए तोयबा यांच्यातील संवाद रेकॉर्ड केला आहे. यामुळे ही माहिती समोर आली. मोदींच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे.

First Published on: October 18, 2022 1:31 PM
Exit mobile version