प्रिन्स चार्ल्स आयुर्वेदिक उपचारांनी बरे झाल्याचा दावा खोटा

प्रिन्स चार्ल्स आयुर्वेदिक उपचारांनी बरे झाल्याचा दावा खोटा

ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स चार्ल्स हे आयुर्वेदिक उपचारांनी बरे झाले आहेत, असा दावा आयुष राज्यमंत्री तथा गोवा लोकसभेचे खासदार श्रीपाद नाईक यांनी केला होता. मात्र, हा दावा लंडनमधील ब्रिटिश राजेशाहीच्या प्रवक्त्यांनी फेटाळून लावला आहे. गेल्या महिन्यात प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, प्रिन्स चार्ल्स बरे झाल्याची माहिती मिळाली आहे. “मला बेंगळुरूमध्ये सौक्य आयुर्वेदिक दवाखाना चालवणारे डॉ. इसाक मथाई यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितले की आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या माध्यमातून प्रिन्स चार्ल्सवर त्यांनी केलेले उपचार यशस्वी झाले आहेत,” नाईक यांनी गुरुवारी गोव्यात पत्रकार परिषदेत सांगितलं.


हेही वाचा – भारत कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या स्थितीत – केंद्रीय आरोग्यमंत्री


“प्रिन्स चार्ल्स माझे रुग्ण असल्याने मी त्यांच्याविषयी कोणत्याही सार्वजनिक व्यासपीठावर बोलू शकणार नाही. गेल्या महिन्यात मी त्यांना लंडनमध्ये भेटलो होतो, परंतु मी त्यांना जे सांगितले होते ते मी सांगू शकत नाही,” असं डॉ. इसाक मथाई यांनी म्हटलं.

 

First Published on: April 3, 2020 12:27 PM
Exit mobile version