कॉंग्रेस नेत्यांचे अकाऊंट सस्पेंड करण्याचे ट्विटरचे स्वतःचे धोरण की मोदी सरकारचे ? प्रियंका गांधींची टीका

कॉंग्रेस नेत्यांचे अकाऊंट सस्पेंड करण्याचे ट्विटरचे स्वतःचे धोरण की मोदी सरकारचे ? प्रियंका गांधींची टीका

कॉंग्रेस नेत्यांचे अकाऊंट सस्पेंड करण्याचे ट्विटरचे स्वतःचे धोरण की मोदी सरकारचे ? प्रियंका गांधींची टीका

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वड्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरील फोटो बदलून काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचा फोटो ठेवला आहे. ट्विटरनं काँग्रेसच्या मुख्य अकाऊंटसह ५ बड्या नेत्यांचे अकाऊंट लॉक केलं आहे. राहुल गांधी यांच्या अकाऊंटवर ट्विटरने कारवाई केली आहे. राहुल गांधीं नियमांचे उल्लंघन केलं असल्याचा आरोप ट्विटरनं केला आहे. यामुळे आता काँग्रेसमधून राहुल गांधींना समर्थन देण्यात येत आहे. तर आता प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलवर राहुल गांधींचा फोटो लावला आहे. तसेच युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी ट्विटरवरील आपलं नाव बदलून राहुल गांधींचे नाव ठेवलं आहे. भाजपने लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे.

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वड्रा यांनी ट्विट करत माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर निशाणा साधत आरोप केला आहे. देशात भाजप सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचा काम करत आहे. याला ट्विटर मदत करत आहे. देशातील काँग्रेस नेत्यांवर कारवाई करण्यात ट्विटर स्वतःचे धोरण की मोदी सरकारचे, ट्विटर भाजप सरकारचे आदेशानुसार काम करत आहे. ट्विटरने अनुसूचीत जाती आयोगाच्या ट्विटर अकाऊंट का बंद केला नाही. अनुसूचित जातीच्या आयोगानेही बलात्कार पिडीत तरुणीच्या कुटुंबीयांचा फोटो पोस्ट केला होता. काँग्रेसच्या नेत्यांनी फोटो ट्विट केला नव्हता तरी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर कारवाई करण्यात आली आहे. प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे की, काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या अकाऊंटवर कारवाई करुन, ट्विटर भाजप सरकारद्वारे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करत आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट तात्पुरतं लॉक करण्यात आलं होते. यानंतर काँग्रेसकडून आरोप करण्यात आला आहे की, काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांसह ५ हजार हून अधिक खाती लॉक करण्यात आली आहेत. यामध्ये अनेक नेत्यांचे अकाऊंट समाविष्ठ आहे.

ट्विटरकडून खुलासा

खासदार राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट तात्पुरते लॉक करण्यात आल्याच्या आरोपावर ट्विटरनं प्रतिक्रिया दिली होती. खासदार राहुल गांधी यांनी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्या अकाऊंटवर कारवाई करण्यात आली होती. राहुल गांधी यांनी नियमांचे उल्लंघन करणारा फोटो पोस्ट केला होता. तसेच लोकांच्या गोपनियतेचं संरक्ष करण्यासाठी त्यांच्या अकाऊंटवर कारवाई करण्यात आली असल्याचे ट्विटरकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

श्रीनिवास यांनी बदललं नाव

युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटचे नाव बदलून राहुल गांधी असं ठेवलं आहे. श्रीनिवास यांनी म्हटलं आहे की, तुम्ही किती खाती बंद कराल प्रत्येक कार्यकर्ता राहुल गांधींचा आवाज बनून तुम्हाला प्रश्न विचारत राहिल. तसेच राहुल गांधींच्या समर्थनासाठी एकजूट होण्यासाठी श्रीनिवास यांनी आवाहन केलं आहे.

काय आहे प्रकरण

दिल्लीत मागील आठवड्यात एका ९ वर्षीय दलित मुलीवर बलात्कार झाला होता. या मुलीची बलात्कार करुन आरोपींनी हत्या केली आहे. मुलीच्या कुटुंबीयांची राहुल गांधी यांनी भेट घेऊन सांत्वन केलं आहे. तसेच त्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत सोबत राहणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. कुटुंबीयांसोबतचा फोटो पोस्ट करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी कुटुंबीयांचा फोटो पोस्ट केल्यामुळे त्यांच्या अकाऊंटवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने ट्विटरला पत्र लिहिले होते. मात्र ट्विटरने राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या फोटोवर आक्षेप घेत त्यांचे अकाऊंट लॉक केलं आहे.

First Published on: August 12, 2021 9:09 PM
Exit mobile version