आंदोलकांचा अतिउत्साह; जिन पिंगऐवजी जाळला किम जोंगचा पुतळा !

आंदोलकांचा अतिउत्साह; जिन पिंगऐवजी जाळला किम जोंगचा पुतळा !

सौजन्य - न्यूज १८

आधीत चीनमधून कोरोनाचा संसर्ग झाल्याने संपूर्ण जग वेठीस धरले गेले असून चीनला आर्थिक कोंडीत पडकण्याचा सर्व देशातून प्रयत्न होत आहे. त्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर सर्वत्र भारतीयांकडून चीनचा निषेध नोंदवला जात आहे. संतापच्या भरात लोकांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा पवित्रा घेतला असून त्यासाठी जागोजागी निदर्शने केली जात आहेत. मात्र पश्चिम बंगालमध्ये चीनच्या निषेधार्ध भाजपच्या नेत्यांनी काढलेल्या रॅलीमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष जिन पिंगच्याऐवजी चक्क उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांचा पुतळा जाळण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होती असून यावर मीम्सदेखील आले आहेत.

काय आहे घटना 

पश्चिम बंगालमधील एका गावात भारत-चीन तणावाबाबत भाजप कार्यकर्त्यांनी चीनविरोधात निषेध रॅलीचे आयोजन केले. चीनविरोधात आयोजित केलेल्या रॅलीमध्ये उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांचा पुतळा जाळण्यात आला आहे. बहुतेक चीनचे पंतप्रधान कोण, याबाबत भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे. ते अख्ख्या रॅलीमध्ये चीनविरोधात घोषणा देत आहेत. असे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. यामध्ये एक भाजप कार्यकर्ता म्हणाला की, आम्ही लडाखमध्ये झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करतो. त्यासाठी आम्ही रॅलीचे आयोजन केले आहे. यासाठी चीनचा प्रधानमंत्री किम जोंग उन यांचा पुतळा जाळणार आहोत.

या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स पाहायला मिळत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना चीनचे पंतप्रधान कोण याचीही माहिती नसल्याचे त्यांची खिल्ली उडवली जात आहे.

हेही वाचा –

आता कोविड रुग्णाचा मृत्यू झाल्यास ४८ तासांत नोंद बंधनकारक; अन्यथा कारवाई!

First Published on: June 18, 2020 10:21 PM
Exit mobile version