शहीद जवानांची ‘आधारकार्ड’वरुन पटली ओळख

शहीद जवानांची ‘आधारकार्ड’वरुन पटली ओळख

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील भ्याड हल्ला

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहीद झाले आहेत. मात्र या जवानांची ओळख पटवणे देखील खूप अवघड झाले होते. अखेर शहीद झालेल्या जवानांच्या आधार कार्ड, घड्याळ आणि पाकिटावरुन ओळख पटवण्यात आली आहे. तर काही शहीद जवानांच्या खिशातून मिळालेल्या सामानांवरुन ओळख पटवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

असा केला दहशतवाद्यांनी हल्ला

पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे जवांना जैशच्या दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने सीआरपीएफच्या जवानांच्या बसला जोरदार धडक दिली. त्यावेळी स्फोट होऊन घटनास्थळी रक्तमांसाचा सडा पडला. अलीकडच्या काळात काश्मीरमध्ये झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. सीआरपीएफचे २,५०० पेक्षा जास्त जवान सुट्टी संपवून काश्मीर खोर्‍यात ड्युटीवर परतत होते. हे सर्व ७८ वाहनांच्या ताफ्यातून प्रवास करत होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. ही घटना श्रीनगर-जम्मू हायवेवरील लाटूमोडमध्ये अवंतीपुरा भागात घडली. स्फोटक भरलेले वाहन आत्मघाती दहशतवादी अदील मोहम्मद नावाचा दहशतवादी चालवत होता. ज्या बसला दहशतवाद्यांच्या वाहनाने धडक दिली होती त्या बसचा केवळ लोखंडी सांगाडा उरला होता. त्यामुळे शहीदांची ओळख पटवणे कठीण झाले होते. अखेर त्यांच्याजवळील सामानांवरुन आणि आधार कार्डवरुन ओळख पटवण्यात आली आहे.


हेही वाचा – दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला

हेही वाचा – पुलवामा भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध!


 

First Published on: February 16, 2019 3:44 PM
Exit mobile version