पुणे आणि उत्तराखंडमधून १२ तबलिगी जमातीच्या व्यक्ती क्वारनटाईनमधून फरार

पुणे आणि उत्तराखंडमधून १२ तबलिगी जमातीच्या व्यक्ती क्वारनटाईनमधून फरार

देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत २५०० पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. याचदरम्यान पुणे व उत्तराखंडमध्ये तबलिगी जमातीच्या ज्या १२ व्यक्तींना क्वारनटाईन करण्यात आले होते ते फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील १० जण २३ फेब्रुवारीला दिल्लीहून पुण्यात आले होते.

पुण्यातील शिरुर तालुक्यातून १० जण फरार झाले आहेत. तर उत्तराखंड मधील काशीपुर येथे क्वारनटाईन सेटंरमधून खिडकीची काच फोडून दोन तबलीगी जमातीच्या व्यक्ती पळून गेल्या आहेत. या फरार व्यक्तींचा शोध घेण्यात येत असून पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी केली आहे.

दिल्लीतील निजामुद्दीम तबलीगी मरकजहून हे दहा जण २३ फेब्रुवारीला पुण्यात आले होते. ते ६ मार्च पर्यंत पुण्यात राहीले. मात्र पोलिसांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर या दहाही जणांनी आपला मुक्काम शिरुरमधील एका मशिदीत हलवला होता. त्यानंतर पुणे प्रशासनाने या दहाही जणांना होम क्वारनटाईन केले होते. त्यांच्या हातावर क्वारनटाईनचा शिक्काही मारण्यात आला होता. पण हे दहाहीजण फरार झाले असून उत्तराखंडमधील दोन जणांनीही पळ काढला आहे. यामुळे पुण्याबरोबरच उत्तराखंड पोलिसांची डोकेदुखी वाढली असून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यताही बळावली आहे.

First Published on: April 4, 2020 7:00 AM
Exit mobile version