पुन्हा उत्तर भारत हादरलं, हरियाणात पुन्हा भुकंपाचे धक्के!

पुन्हा उत्तर भारत हादरलं, हरियाणात पुन्हा भुकंपाचे धक्के!

earthquake uttarakhand : उत्तराखंडात ४.६ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप

उत्तर भारतात पुन्हा एकदा भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्ली-एनसीआरनंतर हरियाणा जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. २.३ रिश्टर स्केलवर अशी त्याची तीव्रता होती.

अधिकृत माहितीनुसार, रोहतक आणि हरियाणाच्या आसपासच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये  काही काळ काही भागात घबराट पसरली होती.

गुरुवारी मिझोरममध्ये भूकंप

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार भूकंपाचे केंद्र रोहतक जिल्ह्यापासून १५ कि.मी. अंतरावर होते. यापूर्वी गुरुवारी मिझोरम राज्यातील बर्‍याच भागात भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी त्याची तीव्रता ५.० नोंदविण्यात आली.


हे ही वाचा – कर्मचाऱ्याने पगार मागितला म्हणून मालकाने कुत्र्याला त्याला चावायला सांगितले!


 

First Published on: June 19, 2020 9:52 AM
Exit mobile version