पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा भाजपामध्ये प्रवेश

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा भाजपामध्ये प्रवेश

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पंजाब लोक काँग्रेस (PLC) हा त्यांचा पक्षही भारतीय जनता पक्षात विलीन केला आहे. पंजाबचे भविष्य पाहायचे असेल तर भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. (Punjab Former CM Captain Amarinder Singh joins bjp)

सोमवारी नरेंद्र सिंह तोमर आणि किरेन रिजिजू या मंत्र्यांकडून त्यांना भाजपचे सदस्यत्व मिळवून देण्यात आले आहे. अमरिंदर यांच्यासोबत त्यांचे अनेक सहकारीही भाजपमध्ये (BJP) दाखल झाल्याचे समजते. यावेळी त्यांनी आमची आणि भाजपची विचारधारा एकच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा; राज्याचा यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करू – मुख्यमंत्री शिंदे

First Published on: September 19, 2022 8:51 PM
Exit mobile version