पी. व्ही. सिंधूची ‘तेजस’ भरारी

पी. व्ही. सिंधूची ‘तेजस’ भरारी

पी. व्ही.सिंधूची 'तेजस' भरारी

बंगळुरूमध्ये झालेल्या एरो इंडिया, एअर शो मध्ये भारताची स्टार बँटमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने सहभाग घेतला आहे. तिने शनिवारी तेजस विमानातून भरारी घेतली. सिंधूने हवाईदल खात्याच्या नुकत्याच दाखल झालेल्या तेजस विमानातून सह – वैमानिक म्हणून उड्डाण केले. हवाई दलात महिला सैनिकांनी केलेल्या उत्तम कामगिरीचा गौरव करण्यासाठी पी. व्ही. सिंधू हिची निवड करण्यात आली. तेजस विमानातून सह-वैमानिक म्हणून उड्डाण करणारी पी. व्ही. सिंधू ही पहिली महिला ठरली आहे. सिंधूने तेजस विमानातून ४० मिनिट उड्डाण केले आहे.

महिलांचे प्रतिनिधित्व करत सिंधूने मारली भरारी

तेजस हे हिंदुस्थान एरोनॉटीकल लिमीटेड कंपनीद्वारे बनवण्यात आलेले विमान आहे. सर्व परवानग्या आणि चाचण्या करून काही दिवसांपूर्वीच तेजस विमान हे हवाई दलात सहभागी झाले आहे. भारताचे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वी तेजस विमानातून उड्डाण केले होते. त्यानंतर पी. व्ही. सिंधू हिने महिलांचे प्रतिनिधित्व करत सह-वैमानिक म्हणून भरारी मारली आहे.

Shuttler PV Sindhu waves as she is about to take off for a sortie in the indigenous Light Combat Aircraft – Tejas in Bengaluru. #AeroIndia2019 pic.twitter.com/w6G6nx6N2n

— ANI (@ANI) February 23, 2019

सिंधू ऑल इंडिया बँटमिंटन चॅम्पियनशिपच्या तयारीत

सिंधू ही सध्या ऑल इंडिया बँटमिंटन चॅम्पियनशिपची तयारी करत आहे. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये ६ ते १० मार्च दरम्यान खेळली जाणार आहे. ओलंपिक रौप्य पदक जिंकल्यानंतर पी. व्ही. सिंधू ही स्टार बनली आहे. तसेच तिच्या खेळातून तरूण पिढी प्रेरित होताना दिसत आहे.

First Published on: February 25, 2019 10:14 PM
Exit mobile version