Qatar Airways : दिल्लीहून दोहाला जाणाऱ्या विमानाची पाकिस्तानमध्ये Emergency Landing

Qatar Airways : दिल्लीहून दोहाला जाणाऱ्या विमानाची पाकिस्तानमध्ये Emergency Landing

Qatar Airways : दिल्लीहून दोहाला जाणाऱ्या विमानाची पाकिस्तानमध्ये Emergency Landing

Qatar Airways QR579 : दिल्लीहून दोहाला जाणारे विमान पाकिस्तानच्या कराचीमध्ये आपत्कालीन परिस्थितीमुळे उतरविण्यात आले आहे. कतार एअरवेजचे हे विमान आहे. (Qatar Airways QR579) Cargo मधून धूर निघत असल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं कतार एअरवेजने सांगितले आहे. सध्या विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानाने कराचीहून पुढे पाठविले जात आहे. या विमानातून जवळपास 100 प्रवासी प्रवास करत होते.
या घटनेच्या चौकशीचे आदेश आता देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कतार एअरवेजचे QR579 हे विमान पहाटे 3.50 वाजता दिल्लीहून दोहाच्या दिशेने निघाले होते. मात्र 5.30 वाजता विमान इमर्जन्सी लाँडिंग करण्यात आले. कतार एअरवेजने सध्या कराची मधून दोहाकडे जाण्यासाठी रिलीफ फ्लाईटची सोय केली जात असल्याचेही कतार एअरवेज कडून सांगण्यात आले आहे. कतार एअरवेजने या घटनेची माहिती देत प्रवाशांच्या असुविधेबाबत त्यांनी प्रवाशांची माफी मागितली आहे.

एअरबस इंडियाचे अध्यक्ष आणि दक्षिण आशिया क्षेत्राचे व्यवस्थापकीय संचालक रेमी मेलार्ड म्हणाले की, एअरबस या घटनेची संपूर्ण माहिती घेईल. यासोबतच याबाबत प्रवासी आणि अधिकाऱ्यांकडूनही चौकशी करण्यात येणार आहे. ही गंभीर बाब आहे. आम्ही या घटनेच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. तांत्रिक बिघाड कसा झाला, याचा शोध घेतला जाईल. आम्ही त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू असही ते म्हणाले.


 

First Published on: March 21, 2022 1:06 PM
Exit mobile version