Rafale Deal : फ्रान्सच्या डसॉल्ट एविएशनचं नवं स्पष्टीकरण!

Rafale Deal : फ्रान्सच्या डसॉल्ट एविएशनचं नवं स्पष्टीकरण!

राफेल विमान ( फोटो सौजन्य - The Morung Express )

गेल्या अनेक महिन्यांपासून राफेल विमान खरेदी करारावर भारतीय राजकारणामध्ये मोठा वाद सुरू असतानाच आता फ्रान्सच्या डसॉल्ट एविएशन कंपनीने नवा खुलासा केला आहे. या करारामध्ये डसॉल्टवर रिलायन्ससोबतच करार करण्याची अट घालण्यात आली होती असा खळबळजनक दावा मीडियापार्ट या फ्रान्समधील संकेतस्थळाने केला होता. मात्र, अशा प्रकारचा कोणताही दबाव आपल्यावर नव्हता, रिलायन्ससोबत पूर्णपणे स्वायत्तपणे करार करण्यात आल्याचा खुलासा आता डसॉल्ट एविएशनने केला आहे. त्यामुळे या प्रकरणात विरोधकांनी उठवलेल्या वादातली हवाच निघून गेली आहे. मात्र, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज फ्रान्स दौऱ्यावर गेल्यानंतरच डसॉल्ट कंपनीने हा खुलासा केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘रिलायन्ससह करार करायची अट नव्हतीच!’

राफेल विमान खरेदी करारामध्ये भारताकडून फ्रान्समधील डसॉल्ट एविएशन कंपनीला रिलायन्ससोबतच करार करण्याची अट घालण्यात आल्याचं समोर आलं होतं. फ्रान्समधल्याच मीडियापार्ट या संकेतस्थळाने यासंदर्भातले वृत्त छापले होते. तसेच, आपल्याकडे करारातील अंतर्गत कागदपत्रे असल्याचा दावा देखील केला होता. मात्र, अशा प्रकारचा कोणताही दबाव किंवा अट घालण्यात आली नसल्याचा खुलासा करत डसॉल्टने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

First Published on: October 11, 2018 12:42 PM
Exit mobile version