“राहुल गांधी उद्योगपतींना भेटण्यासाठी परदेशात जातात; गुलाम नबी यांचा दावा

“राहुल गांधी उद्योगपतींना भेटण्यासाठी परदेशात जातात; गुलाम नबी यांचा दावा

राहुल गांधी परदेशात अवांछित उद्योगपतींना भेटतात, असा दावा काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी एका मुलाखतीत केला आहे. त्यांनी याबाबत फारशी माहिती दिली नसली तरी गुलाम नबी आझाद यांच्या दाव्यावरून भाजपने काँग्रेस आणि राहुल गांधींना घेरले आहे. परदेशात कोणत्या अवांछित उद्योगपतींना भेटतात ते राहुल गांधींनी सांगावे, असे भाजपने म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी नुकतेच एक ट्विट केले होते. यात त्यांनी अदानी प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेसचे पाच माजी नेते भाजपचे हत्यार बनले असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. या माजी काँग्रेस नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद यांचेही राहुल गांधींनी नाव घेतले. यावर एका मुलाखतीत गुलाम नबी आझाद यांना राहुल गांधींच्या दाव्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी बोलताना गुलाम नबी आझाद म्हणाले की, “मला गांधी कुटुंबाबद्दल खूप आदर आहे, त्यामुळे मला त्यांच्या कुटुंबाविरोधात काहीही बोलायचे नाही. नाहीतर ते परदेशात जाऊन अवांछित उद्योगपतींना भेटतात याची उदाहरणे मी देऊ शकतो.”

राहुल गांधींनी अदानी मुद्द्यावरून लक्ष वळवल्याचा आरोप करणारे माजी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद तसेच सिंधिया, किरण रेड्डी, हिमंता बिस्वा सरमा आणि अनिल अँटनी यांचा समावेश आहे. राहुल गांधींच्या या दाव्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून राहुल गांधींवर मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकीही दिली आहे.

राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावरून भाजप सरकारवर हल्लाबोल केलाय. राहुल गांधी यांनी लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित केला. यानंतर विदेश दौऱ्यांवरही राहुल गांधींनी या मुद्द्यावरून सरकारला चांगलेच घेरले. आता मानहानीच्या एका प्रकरणात राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व गमवावे लागले आहे. असं असतानाही राहुल गांधी अदानी मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

First Published on: April 10, 2023 6:57 PM
Exit mobile version