राहुल गांधींनी उचलला लोकसभेत केरळच्या शेतकऱ्यांचा मुद्दा

राहुल गांधींनी उचलला लोकसभेत केरळच्या शेतकऱ्यांचा मुद्दा

फाईल फोटो

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आज लोकसभेत केरळच्या शेतकऱ्यांचा मुद्दा उचलला. लोकसभेत शून्य तासाच्या वेळी बोलताना गांधी म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती खराब असून केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थ-संकल्पात या संदर्भात काहीच उपाय केलेले नाही.

वायनाड मतदार संघातील शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलताना गांधी म्हणाले की, बुधवारी कर्जाच्या त्रासाला कंटाळून बुधवारी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. ते पुढे म्हणाले की, परिस्थितीने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने केरळच्या सरकारने घेतलेल्या कर्जफेड पूढे ढकलण्या बाबतच्या तरतुदीस मान्यता द्यावी तसेच रिझर्व्ह बँकेला या संदर्भात योग्य सूचना द्याव्यात. तसेच कर्जफेडी साठी बँकांनी शेतकऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करू नये.

राहुल गांधी सध्या केरळच्या वायनाडचे खासदार आहेत. २००४ पासून सलग तीन वेळा लोकसभेत अमेठीचे प्रतिनिधित्व केल्या नंतर २०१९ च्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणींकडून राहुल गांधींना पराभव पत्करावा लागला होता.

First Published on: July 11, 2019 2:24 PM
Exit mobile version