कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा चौथा आठवडा तर २ लाखांपेक्षा अधिक मृत्यू, राहुल गांधींची केंद्र सरकारवर खोचक टीका

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा चौथा आठवडा तर २ लाखांपेक्षा अधिक मृत्यू, राहुल गांधींची केंद्र सरकारवर खोचक टीका

कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार घातला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशातील अनेक राज्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. तसेच देशातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णालयात कोरोना रुग्णांना बेड मिळत नाही आहे. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्ये दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. यावरुन काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. तसेच २ लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे परंतु केंद्र सरकारकडून जबाबदारी शून्य असे खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेचा चौथा आठवडा आहे. आतापर्यंत २ लाखपेक्षा अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारकडून जबाबदारी नाही. सरकारने देशाला आत्मनिर्भर केले असा खोचक टोला राहुल गांधी यांनी ट्विट करत लगावला आहे.

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकावर प्रश्नांची सरबत्ती

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि देशातील कोरोना परिस्थिती चिंताजनक झाली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर प्रश्नांचा पाऊस केला आहे. यामध्ये राज्यांना किती ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे, याची यंत्रणा काय आहे, ऑक्सिजन कंसंट्रेटर्सच्या वापरावर योजना आणि भारता बाहेरून येणारे ऑक्सिजन/ वैद्यकीय मदतीची काय अपेक्षा आहे. ते म्हणाले की, कोरोना नियंत्रित करण्यासाठी केंद्र काय निर्बंध, लॉकडाऊन विचार करत आहे? सरकारने ऑक्सिजन टँकर, सिलिंडरची उपलब्धता वाढविण्याच्या संदर्भात काय प्रयत्न करत आहे. असे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केले आहेत.

First Published on: April 30, 2021 7:35 PM
Exit mobile version