काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास राहुल गांधींचा नकार?

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास राहुल गांधींचा नकार?

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक जवळ आल्यामुळे पक्षांतर्गत प्रचंड हालचाली वाढल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेस नेत्यांचा राहुल गांधींना पक्षाच्या अध्यक्षपदासाठी राजी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, राहूल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. दरम्यान राहूल गांधी भारत जोडो यात्रा सोडून बाहेर येणार नसल्याचे यात्रेत सहभागी नेत्यांनी सांगितले.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. त्यामुळे निवडणूकीची गडबड सुरु आहे. 30 सप्टेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. नामनिर्देशनासाठी उमेदवाराने प्रत्यक्ष उपस्थित राहणे गरजेचे आहे. या परिस्थितीतही आणि राज्य समित्यांचा प्रस्ताव येऊनही राहुल गांधी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज देणार नसल्याचे समोर आले आहे.

29 तारखेला भारत जोडो यांत्र कर्नाटकात होणार दाखल –

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सध्या केरळमध्ये काँग्रेसची पदयात्रा सुरू आहे. 23 रोजी विश्रांती घेतली जाणार आहे. तर 29 रोजी भारत जोडो यात्रा कर्नाटकात दाखल होणार आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी आपले संपूर्ण लक्ष आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर त्यांनी केंद्रीत केल्याचे बोलले जात आहे.

खासदार शशी थरूर अध्यक्षपदासाठी इच्छूक –

राहुल गांधींनी नकार दिला असून दुसरीकडे मात्र काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्यासह पक्षाचे इतरही काही नेते अध्यक्षपदासाठी इच्छूक असल्याचे दिसत दिसत आहे. त्यासाठी सोनिया गांधी त्यांना यांच्याकडून निवडणूक लढवण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे.

काँग्रेस अध्यक्ष पदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे शशी थरुर यांना प्रतिस्पर्धी असणार आहेत. मात्र, ते या पदासाठी तयार नसल्याचेही सांगण्यात येत आहे. अशोक गेहलोत यांची पक्षाच्या नव्या अध्यक्षपदी निवड होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2019 मध्येही काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर गेहलोत यांना अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली होती.

First Published on: September 21, 2022 8:29 AM
Exit mobile version