रेल्वेचं ई तिकीट महागणार; IRCTC वसूल करणार चार्ज

रेल्वेचं ई तिकीट महागणार; IRCTC वसूल करणार चार्ज

आयआरसीटीसीद्वारे ई तिकीट काढणे आता महाग होणार आहे. भारतीय रेल्वेने पुन्हा १ सप्टेंबरपासून सर्विस चार्जेस वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे तिकिटांवरील सर्विस चार्जे रद्द करण्यात आला होता. मात्र आता तो पुन्हा लावण्यात येणार आहे.

नॉन एसी साठी १५ रुपये आणि एसीसाठी ३० रुपये सेवा कर लावण्याचा निर्णय IRCTC ने घेतला आहे. यासोबत या ई तिकीटावर सर्विस चार्जेससह GSTचे चार्जस वेगळा लावण्यात येणार आहे. ३ वर्षापुर्वी मोदी सरकारने डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी या ई तिकीटांवरील सर्विस चार्जेस रद्द करण्यात आले होते. तसेच, याआधी रेल्वेतर्फे लावण्यात येणारा सर्विस चार्ज रद्द करण्याचा निर्णय काही काळापुरतं घेण्यात आला होता. मात्र रेल्वे मंत्रालय पुन्हा हा सेवा कर लावू शकते, असे अर्थमंत्रालायाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हा निर्णय घेण्याचे नेमके कारण…

या महिन्याच्या सुरूवातीपासून IRCTC ला ऑनलाईन तिकीटांवर प्रवाशांकडून सेवा शुल्क वसूल करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र २०१६-२०१७ या वर्षात ई तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात २६ टक्क्यांची घट झाली होती. हा सर्विस चार्ज रद्द केल्याचाच परिणाम होता. आता मात्र पुन्हा एकदा सर्विस चार्ज लावण्यात येणार असल्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

First Published on: August 31, 2019 6:37 PM
Exit mobile version