जागतिक शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या ‘त्या’ दोघींचा गौरव!

जागतिक शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या ‘त्या’ दोघींचा गौरव!

( फोटो सौजन्य - RT QUESTION MORE )

प्रो नाटो अटलांटिक समितीच्या वतीने अमेरिकेच्या माजी मंत्री मेडेलिन अलब्राईट आणि सीरियातील बाल हक्क कार्यकर्ती बाना अलाबेद यांचा गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोघींनाही ‘फ्रीडम अवॉर्ड’ने गौरवण्यात येणार आहे. जगातील न्यायिक हक्कांसाठी लढणाऱ्या लोकांचा प्रो नाटो अटलांटिक समितीच्या वतीने गौरव करण्यात येतो. त्या आधारावर मेडेलिन अलब्राईट आणि बाना अलाबेद यांना गौरवण्यात येणार आहे. पण, ऑनलाईन नोंदणीच्या संकेतस्थळावर याबद्दल काही उलटसुलट प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

गौरव करण्यामागील उद्देश

आव्हानात्मक परिस्थितीमध्ये समाजपयोगी आणि दखलपात्र कामे करणाऱ्या लोकांचा प्रो नाटो अटलांटिक कौन्सिलच्या वतीने गौरव करण्यात येतो. बर्लिनमध्ये हा सोहळा पार पडणार असून युएसच्या माजी मंत्री मेडेलिन अलब्राईट आणि बाना अलाबेद यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. इराकमध्ये बालमृत्यूसंदर्भात केलेल्या कार्याची दखल घेत मेडेलिन अलब्राईट यांना ‘चॅम्पियन्स ऑफ ग्लोबल डेमोक्रेसी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. इराकमध्ये मुलांच्या मृत्यूने पूर्णपणे हादरून गेल्याचे मेडेलिन अलब्राईटने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. त्यानंतर त्यांनी केलेल्या कार्याने जगाचे लक्ष वेधून घेतले होते.

बाना अलाबेदचे कार्य

बाना अलाबेदने सीरियामधील युद्धामुळे ओढावलेली परिस्थिती जगासमोर आणली होती. त्यासाठी तिने ट्विटर या समाजमाध्यमाचा अत्यंत योग्यरीत्या वापर केला होता. तिच्यामुळे अमेरिकेसह जगाचे लक्ष हे सीरियातील परिस्थितीकडे वेधले होते. युद्धामुळे सीरियावर ओढावलेली परिस्थिती आणि त्यामुळे मुलांची झालेली अवस्था ही सारी व्यथा बाना अलाबेदने जगासमोर मांडली होती. बाना अलाबेद केवळ आज ९ वर्षाची आहे. वयाच्या सातव्या वर्षीपासून तिने सीरियातल्या परिस्थितीवर आवाज उठवला होता. शिवाय युद्धाला देखील तिने कडाडून विरोध केला होता. सीरियातील अलेप्पो शहर बेचिराख झाले होते. युद्धामुळे मुलांच्या मृत्यूचे प्रमाण देखील लक्षणीय होते. त्यावर बाना अलाबेदने जगाचे लक्ष वेधून घेतले होते. शिवाय जग तिसऱ्या महायुद्धाच्या तोंडावर उभे आहे का? असा सवाल करत सीरियन युद्धाचे भयंकर परिणाम जगासमोर मांडले होते.

First Published on: June 22, 2018 2:02 PM
Exit mobile version