भाजपमध्ये जाणार नाही; पायलट यांनी वाढवला सस्पेंस

भाजपमध्ये जाणार नाही; पायलट यांनी वाढवला सस्पेंस

सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर काँग्रेसने कारवाईचा बडगा उचलला. त्यानंतर पायलट भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरु आहेत. मात्र या चर्चांची हवाच पायलट यांनी काढली आहे. मी भाजपमध्ये जाणार नसल्याचं पायलट यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पायलट नवा पक्ष स्थापन करणार, अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.

सचिन पायलट यांना काँग्रेसने उपमुख्यमंत्री तसंच प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवल्यानंतर भाजपने पायलट यांना भाजपी दारं उघडी आहेत, असं जाहीर केलं. शिवाय पायलट भाजपच्या संपर्कात असल्याचा आरोप खुद्द अशोक गेहलोत यांनी आरोप केला. यामुळे पायलट भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चा व्यर्थ असल्याचं सांगत मी अद्याप काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. मी भाजपमध्ये जाणार नसल्याचं म्हटलं. पुढे काय करायचं याचा निर्णय समर्थकांशी चर्चा करुनच घेतला जाईल, असं पायलट यांनी सांगितलं.


हेही वाचा – पक्षासाठी पाच वर्ष झटलो, गेहलोत यांनी काय केलं? – सचिन पायलट


अशोक गेहलोत यांनी केलेले आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही आहे, असं सचिन पायलट म्हणाले. राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. मग मी पक्षाविरोधात काम का करेन? असा सवालही त्यांनी केला आहे. आपल्या पुढील वाटचालीवर बोलताना सचिन पायलट यांनी, आपण अद्यापही काँग्रेसमध्ये असून पुढे काय करायचं याचा निर्णय समर्थकांशी चर्चा करुनच घेतला जाईल. भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा सवाल पायलट यांना विचारण्यात आला. सचिन पायलट यांनी आपण असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्ट केलं. मी लोकांसाठी काम करत राहणार आहे. आपण कोणत्याही भाजप नेत्याची भेट घेतली नसून ज्योतीरादित्य शिंदे यांना गेल्या सहा महिन्यांपासून भेटलो नसल्याचं सचिन पायलट यांनी सांगितलं.

First Published on: July 15, 2020 10:56 AM
Exit mobile version