काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची घोषणा

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची घोषणा

Rajasthan Election Result 2023 Ashok Gehlot will submit his resignation to the Governor at 5: 30 pm

नवी दिल्ली – आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी एक मोठी घोषणा केली.यावेळी त्यानी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.

यावेळी मी संपूर्ण मुद्दे आजच्या बैठकीत सोनिया गांधी यांच्यासमोर ठेवले. मला मुख्यमंत्रीपदी राहायचे आहे, असा संदेश संपूर्ण देशात असा गेला आहे. मी सोनिया गांधींची माफी मागितली आहे, असेही ते म्हणाले. पुढे मी कोचीमध्ये राहुल गांधींना भेटलो आणि त्यांना काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याची विनंती केली. जेव्हा त्यांनी ते मान्य केले नाही, तेव्हा मी म्हणालो की मी लढेन पण आता त्या घटनेमुळे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे अशोक गहलोत यांनी म्हटले आहे.

त्या बाबत निर्णय सोनिया गांधी घेतील –

या वातावरणात मी नैतिक जबाबदारीने निवडणूक लढवू शकणार नाही. राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही राहाल का? असे विचारले असता ते म्हणाले की, ते मी ठरवणार नाही, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याबाबत निर्णय घेतील.

First Published on: September 29, 2022 3:45 PM
Exit mobile version