मंदिर नाही तर सरकार नाही; उध्दव ठाकरेंचा भाजपला इशारा

मंदिर नाही तर सरकार नाही; उध्दव ठाकरेंचा भाजपला इशारा

उध्दव ठाकरे

निवडणुकी आधी सगळे राम राम करतात मात्र निवडणुकीनंतर आराम केला जातो. गेल्या साडेचार वर्षात या सरकारकडून राम मंदिर उभारणीसाठी कोणतिही हालचाल झाली नाही. राम मंदिर उभारणीसाठी अध्यादेश काढा, कायदा करा किंवा काहीही करा शिवसेना तुमच्या सोबत आहे. राम मंदिरची उभारणी तुम्ही नाही करणार तर कोण करणार असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राम मंदिर नाही तर सरकार नाही असा इशारा भाजप सरकारला दिला आहे.

सर्वांच्या भावना लक्षात घेता केला दौरा

रामललाच्या दर्शनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी उत्तर प्रदेश पोलीस प्रशासन, सरकार आणि नागरिकांचे आभार मानले. सर्वांच्या सहकार्यामुळे माझा दौरा यशस्वी झाला आहे. समस्त हिंदुच्या राम मंदिरासदर्भात असलेल्या भावना लक्षात घेता मी हा दौरा केला असल्याचे मत उध्दव ठाकरे यांना व्यक्त केले आहे.

रामाचा तुरुंगवास संपला पाहिजे

मी गेले दोन दिवस अयोध्येत आहे. आज रामललाचे दर्शन घेतले मात्र मंदिरात जातोय की जेलमध्ये जातोय असं मला वाटत असल्याचे मत उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. श्रीरामांन १४ वर्ष वनवास केला आता रामाचा तुरुंगवास सुरु आहे. प्रभू रामाचा तुरुंगवास संपला पाहिजे. त्यामुळे देशातील तमाम हिंदूंची राममंदीर उभारणीची जी मागणी आहे. त्या मागणीला पाठिंवबा देण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उभी आहे.

अजून किती काळ हिंदूंच्या भावनांशी खेळणार

माझ्या या अयोध्या दौऱ्यावर अनेकांनी टीका केली. काहींनी तर अयोध्या दौरा छुपा अजेंडा असल्याचे म्हटले होते. मात्र श्रीराम मंदिर निर्माण करणे हा शिवसेनेचा अजेंडा आहे. तसंच शिवसेना कोणतेही राजकारण करणार नाही हाच आमचा अजेंडा आहे. राम जन्मभूमीवर रामाचे मंदिर झालेच पाहिजे या भावनेने मी इथे आलो आहे. अजून किती काळ हिंदूच्या भावनांशी खेळणार आहात. कोर्टाच्या हातात असेल तर मग राम मंदिराचे आश्वासन का? असा सवाल उध्दव ठाकरे यांनी केला आहे.

अध्यादेश काढा, कायदा करा

संसंदे हिवाळी अधिवशेन हे मोदी सरकारचे शेटचे अधिवेशन आहे. कारण एप्रिलमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुका होणार आहे. त्यापूर्वी होणारे बजेट अधिवेशन हे केवळ नाममात्र असेल. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात राम मंदिरासाठी अध्यादेश काढा, कायदा करा अशी मागणी करत उध्दव ठाकरे यांनी मोदी सरकारला अडचणीत आणले आहे.

उध्दव ठाकरे मुंबईकडे रवाना

दोन दिवसाचा अयोध्या दौरा संपल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुंबईकडे रवाना झाले आहे. अयोध्येमध्ये गेलेले शिवसैनिक रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर मुंबईकडे रवाना होत आहेत.

संबंधित बातम्या – 

उध्दव ठाकरेंनी घेतले रामललाचे दर्शन

अब हिंदु चूप नही बैठेगा – उद्धव ठाकरे

First Published on: November 25, 2018 10:55 AM
Exit mobile version