Ram Mandir : युट्यूबवर सर्वाधिक पाहिला गेला प्राणप्रतिष्ठा सोहोळा

Ram Mandir : युट्यूबवर सर्वाधिक पाहिला गेला प्राणप्रतिष्ठा सोहोळा

अयोध्या – अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोमवार, २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात बालक रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. संपूर्ण देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष याकडे लागले होते. सुरक्षेच्या कारणांमुळे या सोहळ्याला सर्वसामान्यांना प्रवेश देण्यात आला नव्हता. मात्र या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुरू असल्याने टीव्ही, युट्यूब आणि ओटीटीच्या माध्यमातून कोट्यवधी भाविकांनी हा सोहळा लाइव्ह अनुभवला.

हेही वाचा – http://Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला ‘या’ काँग्रेस नेत्याची हजेरी; उपस्थित राहण्याचेही सांगितले कारण

अयोध्येतील भव्य राम मंदिरात सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला आणि जगभरातील कोट्यवधी श्रीरामभक्तांचं स्वप्न पूर्ण झालं. सुरक्षेच्या दृष्टीने या सोहळ्याला केवळ निमंत्रितच उपस्थितच होते. तरीही टीव्ही, युट्यूबच्या माध्यमातून भाविकांनी या सोहळ्याचा आनंद लुटला. हा सोहळा पाहण्याची लोकांना इतकी उत्सुकता होती की, यूट्यूबवर या सोहळ्याने लाइव्ह स्ट्रीमिंगचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढत नवीन विक्रम प्रस्थापित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युट्यूब चॅनलवरील Ram Lalla’s Pran Pratishtha या व्हिडीओने युट्यूबवर सर्वाधिक लाईव्ह स्ट्रीम व्ह्यूअरशिप मिळवली. 19 दशलक्ष लोकांनी चॅनलवर हा सोहळा लाइव्ह पाहिला. पंतप्रधानांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवरुन या सोहळ्याचे दोन व्हिडीओ टाकण्यात आले. यातील एक व्हिडीओ 10 दशलक्ष लोकांनी लाईव्ह पाहिला, तर दुसरा व्हिडीओ 9 मिलियन लोकांनी पाहिला. केवळ एका व्हिडीओच्या माध्यमातून यूट्यूबवर एक नवा विक्रम प्रस्थापित झाला. या व्हिडीओने चांद्रयान-3 लँडिंग, फिफा वर्ल्डकप सामने या सर्व व्हिडिओंना मागे टाकलं आहे.

हेही वाचा – Ram Mandir : राम मंदिर ठरणार सर्वात श्रीमंत, देशातील ‘ही’ मंदिरे आहेत श्रीमंत 

चांद्रयान-3 लँडिंग

दुसऱ्या क्रमांकावर प्राणप्रतिष्ठा सोहोळ्याने ही आकडेवारी बदलली. यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेल्या लाईव्हस्ट्रीम व्हिडिओंमध्ये पहिल्या क्रमांकावर रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. यामुळे चांद्रयान-3 लँडिंग व्हिडिओ दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. या व्हिडिओला 8.09 मिलिनय लाईव्ह व्ह्यूअर्स मिळाले होते. तर फुटबॉल विश्वचषकाचे 2022 मध्ये झालेले दोन सामने तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

First Published on: January 23, 2024 11:33 AM
Exit mobile version