रामदेव बाबांचे कुंभमेळ्यातील साधु-संतांना आवाहन!

रामदेव बाबांचे कुंभमेळ्यातील साधु-संतांना आवाहन!

रामदेव बाबांचे कुंभमेळ्यातील साधु-संतांना धुम्रपान सोडण्याचे आवाहन

योगगुरु रामदेव बाबा यांनी कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या संत आणि साधुंना धुम्रपान सोडण्याचे आवाहन केले आहे. ‘आपण सगळे भगवान राम आणि श्रीकृष्णाचे भक्त आहोत. त्यांनी कधी धुम्रपान केले नाही, मग आपण का करत आहोत?’, असा प्रश्न रामदेब बाबा यांनी साधुसंतांना विचारला. त्याचबरोबर ‘आपण सर्व साधूंनी सगळ्याच गोष्टींचा त्याग केला आहे. एका मोठ्या कारणासाठी आपण आपलं घर, आई, वडील या सगळ्यांना आपण सोडलं आहे, मग आपण धुम्रपान का नाही सोडू शकणार?’, असे रामदेव बाबा म्हणाले आहेत.

हेही वाचा – एकाही संन्याशाला भारतरत्न नाही हे दुर्भाग्य – रामदेव बाबा

‘मग महात्मांना का नाही सांगू शकत?’

रामदेब बाबांनी सर्व साधूंकडून चिल्लम गोळा केल्या. त्याचबरोबर आपण यापूढे तंबाखूला हात लावणार नाही, अशी शपथदेखील घेण्यास सांगितलं. रामदेव बाबा म्हणाले की, ‘मी अनेक तरुणांना तंबाखू आणि धुम्रपुान सोडायला लावले आहे. मग महात्मांना का नाही सांगू शकत?’


हेही वाचा – लोकसंख्या कमी करण्यासाठी अविवाहित रामदेव बाबांचा ‘नवा फॉर्म्युला’

 

First Published on: January 31, 2019 12:18 PM
Exit mobile version