वादळात अडकलेल्या Spicejet विमानाचे Emergency लँडिंग, 40 प्रवासी जखमी,10 जण गंभीर

वादळात अडकलेल्या Spicejet विमानाचे Emergency लँडिंग, 40 प्रवासी जखमी,10 जण गंभीर

मुंबईहून पश्चिम बंगालमधील दुर्गापूरला जाणारे स्पाईसजेटचे बोईंग B737 विमानाचा वादळामुळे करण्यात आलेल्या इर्मजन्सी लँडिंगमुळे मोठा अपघात झाला आहे. पश्चिम बंगालच्या दुर्गापरु जिल्ह्यातील काढी नझरुल इस्लाम विमातळावर या विमानाचे लँडिंग होणार होते. मात्र लँडिंगदरम्यान विमानात मोठा झटका जाणवला. यामुळे विमानात ठेवलेले सामान प्रवाश्यांच्या डोक्यावर पडले ज्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाले आहे. विमानातील 40 प्रवासी यात जखमी झाले असून यातील 10 प्रवाश्यांची प्रकृती गंभीर आगे.

मात्र, वैमानिकाच्या बुद्धीमत्तेमुळे विमानाचे धावपट्टीवर सुखरूप लँडिंग झाले. ज्यामुळे भीषण अपघात होता होता वाचला. दरम्यान या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्पाईसजेटचं बोईंग B737 विमान SG-945 नावाचे विमान दुर्गापूरच्या काझी नजरुल इस्लाम विमानतळावर उतरत असताना ते बैसाखी वादळात अडकले. यामुळे विमानावरील नियंत्रण गोंधळल्याने केबिनमध्ये ठेवलेले सामान प्रवाशांच्या अंगावर पडू लागले आणि त्यामुळे सुमारे 40 प्रवासी जखमी झाले.

विमान दुर्गापूरला पोहोचल्यानंतर जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. सर्व जखमी प्रवाश्यांवर आता उपचार सुरु आहेत. या दुर्दैवी घटनेवर स्पाइसजेटने दु:ख व्यक्त करत जखमी प्रवाश्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.


Weather Update : आजपासून हवामानात बदल; उष्णतेपासून मिळणार दिलासा, ‘या’ भागात पावसाची शक्यता

First Published on: May 2, 2022 9:25 AM
Exit mobile version