अयोध्येच्या श्री राम मंदिरात रंगपंचमीचा उत्साह

अयोध्येच्या श्री राम मंदिरात रंगपंचमीचा उत्साह

सोमवारी ( 25 मार्च) संपूर्ण देशभरात रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात पार पडला. अयोध्येच्या श्री राम मंदिरात देखील रंगपंचमी धुमधडाक्यात पार पडली. अयोध्या श्री राम मंदिरातील ही पहिलीच रंगपंचमी होती त्यामुळे लाखो भाविक रामलल्लांच्या दर्शनासाठी उपस्थित होते. सध्या सोशल मीडियावर राम मंदिरातील रंगपंचमीचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये भाविक जल्लोषात रंगपंचमी साजरी करताना दिसत आहेत.

अयोध्येच्या श्री राम मंदिरात रंगपंचमीचा उत्साह

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अयोध्येच्या श्री राम मंदिरातील फोटोंमध्ये रामलल्लांच्या मूर्तीवर विविध रंगांच्या फुलांनी उधळण केली जात आहे.

शिवाय रामलल्लांच्या मनमोहक मूर्तीला देखील सुंदर दागिने आणि पोशाख घातलेला आहे. यावेळी मूर्तीच्या चेहऱ्यावर रंग देखील लावण्यात आलेला आहे. गाभाऱ्यात दर्शनासाठी उपस्थित असलेले भाविक जय श्री रामचा नारा लावताना दिसत आहेत.

श्री रामांना दाखवण्यात आले 56 भोग

सोमवारी रंगपंचमीनिमित्त मंदिरातील पुजाऱ्यांनी श्री रामांना 56 विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला. तसेच यावेळी रामलल्लांना खूश करण्यासाठी भाविकांसोबत पुजाऱ्यांनी देखील होळीची गाणी गात मूर्तीसमोर नृत्य केले.


हेही वाचा :

Holi 2024 : भारताप्रमाणेच या देशांमध्येही साजरी केली जाते धुळवड

First Published on: March 26, 2024 11:46 AM
Exit mobile version