ओडिसामध्ये दिसला काळ्या रंगाचा दुर्मीळ वाघ; व्हिडीओ होतोय व्हायरल

ओडिसामध्ये दिसला काळ्या रंगाचा दुर्मीळ वाघ; व्हिडीओ होतोय व्हायरल

तुम्ही जगभरातील अनेक जंगली प्राणी पाहिले असतील. जे आपल्या खासियतेमुळे ओळखले जातात. मात्र अनेकदा असं काहीतरी पाहायला मिळतं. ज्याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर असंच काहीतरी पाहायला मिळत आहे. जे पाहिल्यानंतर तुम्ही एक क्षण देखील तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेऊ शकत नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक दुर्मीळ वाघ दिसून येत आहे. जो काळ्या रंगाचा आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून लोकांकडून त्याला पसंती देखील मिळत आहे.

व्हायरल होत असलेल्या हा व्हिडीओ ओडिसा टायगर रिजर्व येथील सांगण्यात येत आहे. जिथे खूप दुर्मीळ असा काळ्या रंगाचा वाघ दिसून आला आहे. तसेच त्याच्या अंगावर पिवळ्या पट्ट्या सुद्धा दिसून येत आहेत. या व्हिडीओतील हा वाघ तेथील एका झाडावर चढायचा प्रयत्न करत आहे.

 

First Published on: August 1, 2022 5:31 PM
Exit mobile version