आम्हाला मरायला एकट सोडून नका, जगभरातील नेत्यांकडे राशिद खानची विनवणी

आम्हाला मरायला एकट सोडून नका, जगभरातील नेत्यांकडे राशिद खानची विनवणी

आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेला अफगाणिस्तानचा स्पिनर राशिद खानने आपल्या देशवासीयांचा उल्लेख करत एक भावुक संदेश लिहिला आहे. अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहता राशिद खानने जगभरातील नेत्यांना अफगाणिस्तानातील नागरिकांना वाचवण्याची मागणी केली आहे. आम्हाला मरायला एकट सोडू नका, अफगाणिस्तानला वाचवण्याची विनवणी त्याने केली आहे. सद्यस्थितीला तालिबान्यांकडून एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने अफगाणिस्तानातील मोठ्या शहरांवर ताबा मिळवण्यात येत आहे. त्यामुळेच संपुर्ण अफगाणिस्तानातील पूर्वोत्तर भागातील हिश्शावर तालिबान्यांना एकापाठोपाठ एक शहर असे नियंत्रण मिळवले आहे. तालिबानी अतिरेकी संघटनांनी अफगाणिस्तानातील ८ शहरांवर तसेच राजधानीलाही ताब्यात घेतले आहे.

तालिबानी अतिरेकी कारवायांमुळेच अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी उत्तरेकडील भागातील शहराकडे फ्लाईटने प्रवास केला. मजार ए शरीफ या उत्तरेकडील शहरात राष्ट्रपती पोहचले. सध्या राष्ट्रपतींकडून तालिबान्यांना मागे सारण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून मदत घेतली जात आहे. पण या सगळ्या प्रकरणात राशिद खान अतिशय दुःखी आहेत. त्याबाबतचे एक ट्विट राशिद खानने केला आहे. ट्विटमध्ये राशिद खानने म्हटले आहे की सध्या माझा देश संकटात आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी निर्दोष अशा महिला आणि लहान मुलांची दररोज हत्या होत आहे. घरांसोबतच संपत्तीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नागरिकांना आपले घर सोडून जाण्यासाठीची नाईलाजाची अशी वेळ आणली जात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आम्हाला एकट सोडू नका असेही त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अफगाणिस्थानातील लोकांना बरबाद होण्यापासून वाचवा. आम्हालाही शांती हवी आहे, असेही राशिद खान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. राशिद खान येत्या दिवसात इंग्लंडच्या द हंड्रेड मेन्स या स्पर्धेत सहभागी होत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने राशिद खान हा ट्रेंट रॉकेट्स या फ्रॅंचायसीचा हिस्सा आहे. अमेरिकन सेनेने माघार घेतल्यानंतर पुन्हा एकदा अफगानिस्तानात तालिबानी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा कहर करायला सुरूवात केली आहे. तालिबान्यांनी क्रुरतेची हद्द करतानाच फक्त कपडे घट्ट घातले आणि सोबत पुरूष नव्हता म्हणून हत्या केल्याचे एक प्रकरण समोर आले आहे.


 

First Published on: August 12, 2021 12:35 PM
Exit mobile version