खूशखबर, रेपोच्या दरात ०.२५ टक्क्यांनी कपात; कर्जदारांना रिझर्व्ह बँक पावली

खूशखबर, रेपोच्या दरात ०.२५ टक्क्यांनी कपात; कर्जदारांना रिझर्व्ह बँक पावली

भारताची शिखर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीसाठीचे पतधोरण जाहीर केले आहे. या पतधोरण समितीने रेपो रेटमध्ये २५ बेस पॉईंट्सची कपात केली आहे. मध्यवर्ती बँकेच्या सहा सदस्यीय समितीने सलग दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. त्यामुळे आता रेपो रेट ६.२५ टक्क्यांवरुन ६ टक्क्यांवर आला आहे. बँकांनी रेपो रेटमधील कपातीचा फायदा सर्वसामान्य कर्जदारांना होण्याची शक्यता असल्यामुळे कर्जदारांना रिझर्व्ह बँक पावली आहे.

सलग दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात

मध्यवर्ती बँकेच्या सहा सदस्यीय समितीने सलग दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. शक्तीकांत दास यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्यापासून सलग ही दुसरी कपात आहे. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यात दोनदा व्याजदरात कपात करणारा भारत हा आशिया खंडातील एकमेव देश झाला आहे. महागाई कमी झाल्याने रेपो रेट जाहीर करताना अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्दे आरबीआयकडून विचारात घेतले जातील, असा कयास होता. विविध आकडेवारींवरुन हा मुद्दा अधोरेखित झाला असून यामुळेच आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला.

First Published on: April 4, 2019 12:39 PM
Exit mobile version