RBI डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी दिला पदाचा राजीनामा

RBI डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी दिला पदाचा राजीनामा

विरल आचार्य (सौजन्य-युट्यूब)

भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. विरल आचार्य यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा दिला आहे. डेप्युटी गव्हर्नर पदावरील त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यानंतर पूर्ण होणार आहे. मात्र त्या आधीच त्यांनी हे पद सोडले आहे. विरल आचार्य यांची आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. २३ जानेवारी २०१७ ला त्यांनी पदभार स्वीकारला होता. मात्र आपला कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच त्यांनी पद सोडले आहे.

गेल्या वर्षी २६ ऑक्टोबर रोजी विरल आचार्य यांनी आरबीआयची स्वायत्तता कायम रहावी, याबाबत वक्तव्य केले होते. त्यामुळे ते चर्चेत आले होते. गेल्या वर्षी केंद्र सरकार आणि आरबीआयमधील वाद विकोपाला गेला होता. त्यामुळे याआधी उर्जित पटेल गर्व्हनर पदावरून पायउतार झाले. आता डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनीही पद सोडले आहे.

हेही वाचा –

Video: भाईजान सलमान ‘चाचू’चा फॅमिली टाईम!

वर्षा बंगला ‘डिफॉल्टर’; मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनीही थकवले पाणी बिल

First Published on: June 24, 2019 9:35 AM
Exit mobile version