‘तोच पंजाबचा खरा मुख्यमंत्री असेल…’ निवडणुकीपूर्वी सोनू सूदचा नवा व्हिडीओ व्हायरल

‘तोच पंजाबचा खरा मुख्यमंत्री असेल…’ निवडणुकीपूर्वी सोनू सूदचा नवा व्हिडीओ व्हायरल

तोच पंजाबचा खरा मुख्यमंत्री असेल... निवडणुकीपूर्वी सोनू सूदचा नवा व्हिडीओ व्हायरल

पंजाब विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून अनेक पक्ष आता कामाला लागले आहेत. यातच पंजाबमध्ये भाजपाला मिळणारा वाढता विरोध पाहता काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी आत्तापासूनचं कंबर की आहे. काँग्रेसने सोमवारी एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेता सोनू सूद स्वतःला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याऐवजी खरा मुख्यमंत्री तो असतो जो या पदासाठी पात्र असतो असे म्हणताना दिसतोय. काँग्रेसच्या पंजाब युनिटने हा 36 सेकंदाचा व्हिडीओ ट्विट केला आहे, ज्याच्या शेवटी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे विविध कार्यक्रमांचे फुटेज दाखवण्यात आले आहेत.

सोनू सूदचा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसने ट्विट केले की, “बोल रहा पंजाब, अब पंजे के साथ- मजबूत करेंगे हर हाथ.” तर व्हिडिओमध्ये सोनू सूद असे म्हणताना दिसतोय की, “खरा मुख्यमंत्री किंवा राजा ही अशी व्यक्ती आहे ज्याला खुर्चीवर बसण्यास भाग पाडले जाते. अशा लोकांना संघर्ष करावा लागत नाही किंवा लोकांना सांगण्याची गरज वाटत नाही की, मी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आहे आणि मी त्याला पात्र आहे.

राज्याचे पहिले दलित मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, असे म्हटले होते. याआधी जेव्हा जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला तेव्हा त्याचा फायदा पक्षाला निवडणुकीत झाला आहे, यावर त्यांनी भर दिला. मात्र काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही असे म्हणत त्यांनी “सामूहिक नेतृत्वा” अंतर्गत निवडणुकीला सामोरे जाणार असे सांगितले आहे.

पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांनी नुकतेच पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले होते की, ‘मुख्यमंत्री कोण होणार हे पंजाबची जनता ठरवेल. तुम्हाला कोणी सांगितले की, हायकमांड (काँग्रेस) मुख्यमंत्री करेल? ‘पंजाबचे लोक आमदार निवडतील आणि मुख्यमंत्री कोण असेल तेही तेच निवडतील.’

सोनू सूदची बहीण मालविका सूद सच्चर यांनी अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सोनू सूदची बहीण मालविका सूद सच्चर मोगा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होणार आहेत.


पेंगाँग सरोवरावरील अवैध पूल लवकर पूर्ण करण्यासाठी चीनची धावपळ, नवे फोटो व्हायरल

First Published on: January 18, 2022 5:54 PM
Exit mobile version