कोरोनातही मोदी सरकारच्या तिजोरित उच्चांकी भर, रेकॉर्ड ब्रेकिंग GST महसूल रक्कम जमा

कोरोनातही मोदी सरकारच्या तिजोरित उच्चांकी भर, रेकॉर्ड ब्रेकिंग GST महसूल रक्कम जमा

देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाने मोठा हाहाकार घातला आहे. देशातील सर्वच राज्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवसाला लाखो रुग्णांची नोंद होत आहे. ऑक्सिजन पुरवठा,कोरोना लस,रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. एकंदर कोरोना परिस्थितीत देश भरडला जात असताना केंद्रातील मोदी सरकारच्या तिजोरीत मात्र कराचा उच्चांकी निधी जमा झाला आहे. देशात लॉकडाऊन असताना मोदी सरकारला जीसएटी आणि करातून मोठ्या प्रमाणात आणि आतापर्यंतची सर्वात जास्त रुपयांचा महसूल मिळाला आहे. या कराच्या निधीमुळे केंद्र सरकारला थोडा दिलासा मिळाला आहे.

देशात लॉकडाऊन असताना तसेच सर्वच राज्यात कोरोना प्रादुर्भाव हाहाकार घालत असताना केंद्र सरकारला जीएसटी, आर्थिक करातून एप्रिल महिन्याचा १ लाख ४१ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. केंद्र सरकारला आतापर्यंत मिळालेल्या कराच्या निधीमध्ये एप्रिल महिन्यातील निधी सर्वात जास्त आहे. यापूर्वी मार्च महिन्यात मोदी सरकारला १ लाख २३ हजार ९०२ कोटींचे उत्पन्न जीएसटीमधून प्राप्त झाले होते. पहिल्या जीएसटीच्या किंमतीपेक्षा तब्बल १४ टक्क्यांनी जास्त निधी केंद्र सरकारला मिळाला आहे.

केंद्र सरकारकडे जमा झालेल्या एप्रिल महिन्यातील जीएसटीमध्ये १ लाख ४१ हजार ३८४ कोटी रुपये महसूल उपलब्ध झाला. यामध्ये एकूण २७ हजार कोटी ८३७ कोटी रुपये केंद्रीय जीएसटी आहे. तर राज्याच्या जीएसटीमधून ३५ हजार ६२१ कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच इंटिग्रेटेड जीएसटी ६४ हजार ४८१ कोटी यामध्ये २९ हजार कोटी ५९९ ककोटी रुपये वस्तूवरील आयात करत आहे. सेसमधून ९ हजार ४४५ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे.

First Published on: May 1, 2021 6:09 PM
Exit mobile version