जाणून घ्या यंदाच्या कार्तिकी पौर्णिमेच महत्त्व

जाणून घ्या यंदाच्या कार्तिकी पौर्णिमेच महत्त्व

कार्तिकी पौर्णिमा २०१८

दिवाळीनंतर आलेल्या कार्तिकी पौर्णिमेचा योग अतिशय दुर्मिळ असा आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला कृतिका नक्षत्रमध्ये ज्या महाकाळाचा योग येतो, तोच यंदा ५४ वर्षानंतर महाकार्तिकी योग उद्याच्या, २३ नोव्हेंबर २०१८ ला आला आहे. या दिवशी प्रातः काळ पौर्णिमा, कृतिका नक्षत्रमध्ये आणि ग्रहांच्या स्थितीनुसार या वर्षात गुरु वृश्चिकवर, शनि धनुवर, सूर्य वृश्चिकवर आणि शुक्रवार असा शुभ योग जुळून आला आहे.

या दिवशी केलं जात दीपदान

शास्त्रानुसार या दिवसाला देव दिवाळीदेखील म्हटलं जातं. या दिवशी दीपदान केलं जातं. या खास दिवशी दीपदान केल्यामुळे निरोगी आरोग्य आणि सुखशांती मिळते. या दिवशीच श्रीहरी देवाच्या मत्स्य अवताराचा जन्म झाला होता, असेही म्हटले जाते. त्यामुळे या खास दिवसाला गंगेत स्नान केल्यानंतर दीपदान केले जाते. ब्रम्हा, विष्णु, महेश, अंगिरा आणि आदित्य या विशेष दिवसाचे महत्त्व मान्य केले आहे. त्यामुळे गंगा स्नान, दीपदान, होम, यज्ञ आणि उपासना करण्याबाबत शास्त्रात नमूद केले आहे.

First Published on: November 22, 2018 11:56 AM
Exit mobile version