Remdesivir : केंद्राकडून महाराष्ट्राला रेमडेसिवीरच्या सर्वाधिक ८ लाखांहून अधिक कुप्यांचा पुरवठा

Remdesivir : केंद्राकडून महाराष्ट्राला रेमडेसिवीरच्या सर्वाधिक ८ लाखांहून अधिक कुप्यांचा पुरवठा

Remdesivir : केंद्राकडून महाराष्ट्राला रेमडेसिवीरच्या सर्वाधिक ८ लाखांहून अधिक कुप्यांचा पुरवठा

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोरोना रुग्णांची संख्या देशात आणि राज्यात सातत्याने वाढत आहे. राज्यात लॉकडाऊन केल्यापासुन कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. तसेच आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठा करण्यावरुन राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाद सुरु होता. परंतु २१ एप्रिल ते ९ मे या कालावधीसाठी देशात केंद्र सरकारने राज्यांना रेमडेसिवीरच्या वाटपात लक्षणीय वाढ करण्यत आली आहे. यामध्ये २१ एप्रिल ते ९ मे या कालावधीसाठी ८ लाखांहून अधिक रेमडेसिवीरच्या कुप्यांचा पुरवठा करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे.

देशात रेमडेसिवीरचे उत्पादन वाढवल्यानंतर केद्राकडून रेमडेसिवीर पुरवठा करण्यात येणाऱ्या संख्येत पुन्हा बदल करण्यात आला आहे. रेमडेसिवीरचे उत्पादन वाढवले आहे. तसेच इतर कंपन्याकडूनही रेमडेसिवीर उपलब्ध होणार असल्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्र, गुजरातला सर्वाधिक रेमडेसिवीर देण्यात आले आहे. महाराष्ट्राला येणाऱ्या दिवसांमध्ये एकुण ४ लाख ७३ हजार ५०० रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कुप्या देण्यात येणार आहेत. राज्यांना केल्या जाणाऱ्या रेमडेसिवीरच्या वाटपात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. २१ एप्रिल ते ९ मे २०२१ या कालावधीसाठी रेमडेसिविरच्या वाटपात वाढ करून महाराष्ट्राला ८,०९,५०० कुप्या पुरवण्यात येणार आहेत.

सरकारी माहितीनुसार जायडस कॅडिला, हेरेरो, माइलान, सिप्ला, सिनजीन, सन, जुबिलेंट आणि डॉ.रेड्डीज या कंपन्या रेमडेसिवीर महाराष्ट्राला पुरवतील. तर दुसरा भाग गुजरातला देण्यात येणार आहे. गुजरात राज्याला एकुण १ लाख ८२ हजार ५०० रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात येणार आहेत. डॉ.रेड्डीज कंपनी सोडून सर्व कंपन्या गुजरातला रेमडेसिवीरचा पुरवठा करणार आहेत. भारतातील रेमडेसिवीरचा तुटवडा दुर करण्यासाठी देशाबाहेरुन रेमडेसिवीरची आयात करण्यात येणार आहे. यामध्ये आतापर्यंत ७५ हजार रेमडेसीवीर इंजेक्शनची खेप पोहचली आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा दुर होणार आहे.

First Published on: May 1, 2021 10:48 PM
Exit mobile version