Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील ५१ पोलिसांचा गौरव, ७ जणांना शौर्य; तर चौघांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील ५१ पोलिसांचा गौरव, ७ जणांना शौर्य; तर चौघांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील ५१ पोलिसांचा गौरव, ७ जणांना शौर्य; तर चौघांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

देशभरात उद्या, बुधवारी ७३वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी पोलिसांना त्यांच्या शौर्याबद्दल गौरविण्यात येते. यंदाही प्रजासत्ताक दिनी एकूण ९३९ पोलीस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ५१ पोलिसांना समावेश आहे. महाराष्ट्रातील अतिरिक्त पोलीस महासंचालक विनय महादेवराव करगावकर, कमांडंट प्रल्हाद निवृत्ती खाडे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत रामभाऊ गुंडगे आणि पोलीस उपनिरीक्षक अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात येणार आहे.

देशातील १८९ पोलिसांना पोलीस शौर्य पदके देण्यात येणार आहेत. १८९ शौर्य पुरस्कारांपैकी, सर्वाधिक १३४ पुरस्कार जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील शौर्य कामगिरीबद्दल तिथल्या पोलिसांना पुरस्कृत करण्यात आले. अतिरेकी डाव्या विचारसरणीने प्रभावित भागातील ४७ पोलीस आणि ईशान्य प्रदेशात १ पोलिसांस त्यांच्या शौर्याबद्दल पुरस्कृत केले आहे. शौर्य पुरस्कार प्राप्त करणार्‍यांमध्ये ११५ जवान जम्मू-काश्मीर पोलीस, ३० सीआरपीएफ, ३ आयटीबीपी, २ बीएसएफ, ३ एसएसबी, १० छत्तीसगड पोलीस, ९ ओडिसा पोलीस आणि ७ महाराष्ट्र पोलीस आणि उर्वरित राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातील आहेत. तसेच ४२ जवानांना अग्निशमन सेवा पदके घोषित करण्यात आली आहेत. यापैकी १ जवानास राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक आणि २ जवानांना त्यांच्या संबंधित शौर्याबद्दल, शौर्यासाठीचे अग्निशमन सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.

पोलिस शौर्य पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील पुढील पोलिसांचा समावेश आहे

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी


हेही वाचा – Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनी गुप्तचर यंत्रणेचा अलर्ट! देशात कारस्थानाचा देशद्रोहींचा कट; CAA-NRC मधील लोकांवर करडी नजर


 

First Published on: January 25, 2022 3:42 PM
Exit mobile version