Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनी गुप्तचर यंत्रणेचा अलर्ट! देशात कारस्थानाचा देशद्रोहींचा कट; CAA-NRC मधील लोकांवर करडी नजर

Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनी गुप्तचर यंत्रणेचा अलर्ट! देशात कारस्थानाचा देशद्रोहींचा कट; CAA-NRC मधील लोकांवर करडी नजर

Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनी गुप्तचर यंत्रणेचा अलर्ट! देशात कारस्थानाचा देशद्रोहींचा कट; CAA-NRC मधील लोकांवर करडी नजर

संपूर्ण देशभरात उद्या, बुधवारी ७३वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. त्यापूर्वीच देशातील गुप्तचर यंत्रणेने दिल्ली पोलिसांना अलर्ट जारी केला आहे. दिल्लीत उद्या, २६ जानेवारीला कार्यक्रमाच्या ठिकाणी वातावरण बिघडवण्याचे कारस्थान देशद्रोही करू शकतात, अशी शक्यता गुप्तचर यंत्रणेने वर्तवली आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी सीएए-एनआरसी आणि शेतकरी आंदोलनातील सामिल असलेल्या लोकांवर करडी नजर ठेवण्यास सांगितले आहे. गुप्तचर यंत्रणेच्या अलर्टनंतर लाल किल्ला आणि नवी दिल्ली क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भागात सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

गुप्तचर यंत्रणेने अलर्टमध्ये सांगितले आहे की, ‘दिल्लीतील दंगलीत सामिल असलेले लोकं देशद्रोहींच्या संपर्कात आहेत आणि त्यांचा हेतू प्रजासत्ताक दिनाचे वातावरण खराब करण्याचा आहे.’ अलीकडेच बंदी घातलेल्या शीख फॉर जस्टिसच्या गुरुपतवंत सिंह पन्नूने व्हिडिओ जारी करून काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचे समर्थन केले आणि लोकांना दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला पोहोचण्यास सांगितले. त्यामुळे या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून २५ आणि २६ जानेवारीच्या रात्री दिल्लीतील सीमा सील केल्या जातील. तसेच दिल्लीतील पाच सीमांवर अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी असेल.

दिल्ली पोलीस कमिशनर राकेश अस्थान म्हणाले की, ‘गुप्तचर यंत्रणेच्या अलर्टच्या आधारावर सुरक्षेची व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दिल्ली पोलीसचे पोलीस उपायुक्त, सहाय्यक उपायुक्त, इन्स्पेक्टर आणि कमांडरसह १० हजारांहून अधिक जवान सुरक्षेसाठी तैनात असतील. याशिवाय सीआरपीएफचे ६५ कंपन्यांचे जवान सहाकार्यासाठी सामील असतील.’


हेही वाचा – Republic Day: सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना आले रेकॉर्डेड कॉल्स; २६ जानेवारीला दिल्लीमध्ये काश्मीरचा झेंडा फडकवण्याची धमकी


 

First Published on: January 25, 2022 1:21 PM
Exit mobile version