रोहित शेखर हत्याकांड प्रकरणी पत्नी अपूर्वाला अटक

रोहित शेखर हत्याकांड प्रकरणी पत्नी अपूर्वाला अटक

दिल्ली पोलिसांनी रोहित शेखरच्या पत्नीला केली अटक

रोहित शेखर हत्याकांड प्रकरणी त्याची पत्नी अपूर्वीला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अपूर्वा शेखरला अटक केली आहे. रोहितचा संशयित अवस्थित मृतदेह सापडला होता. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरु केला त्यावेळी रोहितच्या पत्नीवर त्यांना संशय आला. पोलिसांना या प्रकरणात अपूर्वाच्याविरोधात ठोस पूरावा मिळाल्यानंतर त्यांनी तिला अटक केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्याच्या आदल्या रात्री रोहित आणि अपूर्वा यांच्यामध्ये भांडण झाले होते. पूरावा लपवण्यासाठी अपूर्वाने तिचा मोबाईल फॉर्मट केला होता.

दोघांमध्ये झाले होते भांडण 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री एन डी तिवारी यांचा मुलगा शेखर तिवारी हत्या प्रकरणात त्याच्या पत्नी अपूर्वा शुक्लाला पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी रोहित शेखरची पत्नी अपूर्वाची सलग तीन दिवस चौकशी केली. या चौकशी दरम्यान दिल्ली क्राईम ब्रॅचला अपूर्वा विरोधात ठोस पुरावा सापडला. त्यानंतर त्यांनी आज तिला अटक केली. चौकशी दरम्यान अपूर्वाने मान्य केले आहे की, सोमवारी रात्री ११ वाजता रोहित आणि तिचे भांडण झाले होते. दोघांनी एकमेकांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. १६ एप्रिलला रोहितचा संशयित अवस्थेत मृतदेह सापडला होता.

लग्न केल्यापासून दोघे खूश नव्हते

अपूर्वाने ती रोहितशी लग्न केल्यापासून खूश नव्हती असे सांगितले. त्यामुळेच तीने रोहितचा गळा आवळून हत्या केली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, रोहितच्या आईने रोहितची हत्या अपूर्वानेच केली असल्याचा संशय व्यक्त केला होता. दिल्लीतील डिफेन्स कॉलनीतील घराची किंमत करोडोंमध्ये असल्याने ही संपत्ती हडपण्यासाठीच तीने हे कृत्य केले असल्याचा आरोप रोहितच्या आईने केला होता.

First Published on: April 24, 2019 12:21 PM
Exit mobile version