हौसेसाठी या महाशयांनी शरीरावर केल्या ५१६ सर्जरी, पाहा कसा झालाय चेहरा!

हौसेसाठी या महाशयांनी शरीरावर केल्या ५१६ सर्जरी, पाहा कसा झालाय चेहरा!

हौसेला मोल नसतं असं म्हणतात. पण त्याच हौसेसाठी आपल्या अनमोल शरीरावर प्रयोग करण्याचीच हौस अनेकांना असते. जर्मनीच्या बर्लिनमध्ये राहणाऱ्या रॉल्फ बुचोलज यांचं देखील असंच आहे. ६० वर्षीय बुचोलज यांना अंगावर टॅटू काढणं, शरीराच्या मूळ ठेवणीत बदल करणं, पिना किंवा रिंगा टोचून घेणं याचा भयंकर नाद आहे. याच नादापायी त्यांनी स्वत:च्या शरीरावर तब्बल ५१६हून अधिक सर्जरी करून घेतल्या आहेत. यातल्या बहुतांश सर्जरी या चेहऱ्यावर केल्या आहेत. त्यांच्या या छंदाची दखल थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं देखील घेतली आहे. सर्वाधिक शरीर बदल करणाऱ्या व्यक्तींच्या यादीत त्यांचं नाव समाविष्ट झालं आहे. पण आपल्या नैसर्गिक शरीरात इतके बदल करण्याची हौस त्यांच्या रुपात कोणते बदल करून गेली?

रॉल्फ बुचोलज हे बर्लिनमध्ये एका टेलिकॉम कंपनीमध्ये काम करतात. आणि त्यांच्या या अजब-गजब शौकचा कुणालाही काहीही प्रॉब्लेम नाही. वयाच्या ४०व्या वर्षी रॉल्फ बुचोलज यांनी आपल्या शरीरावर पहिला टॅटू काढून घेतला होता आणि चेहऱ्यावर छिद्र करून पहिली रिंग गोवून घेतली होती. गेल्या २० वर्षांत त्यांच्या चेहऱ्यावर अनेक बदल झाले आहेत.

रॉल्फ बुचोलज यांनी ओठांवर सर्व बाजूंनी पिना लावून घेतल्या आहेत. तसेच, त्यांच्या खालच्या ओठांवर अनेक पिना आणि रिंगा देखील टोचून घेतल्या आहेत. त्यांच्या नाकात दोन्ही बाजूंनी पिना आणि रिंगा आहेत. दोन्ही भुवयांना देखील वरून खालपर्यंत पिना टोचलेल्या आहेत. सर्वात लक्षवेधक म्हणजे त्यांचं कपाळ. प्राण्यांना असतात, तशी दोन शिंग त्यांनी त्यांच्या कपाळावर लावून घेतली आहेत. कानांवर देखील अनेक सर्जरी करून घेतल्या आहेत. यामुळे त्यांचा चेहरा पूर्वीपेक्षा १०० टक्के बदलला आहे. पण तरीदेखील ते म्हणतात, ‘माझ्यात जे बदल झालेत, ते फक्त बाहेरचे आहेत. अजूनही आतून मी तोच पूर्वीचा रॉल्फ बुचोलज आहे’!

आधी असा दिसायचा रॉल्फ!

पहिल्यांदा रॉल्फ बुचोलज यांना पाहणाऱ्या व्यक्तीला कदाचित त्यांची भिती वाटू शकते. पण अनेकांसाठी रॉल्फ हे आकर्षणाचा विषय ठरले आहेत!

First Published on: October 26, 2020 7:36 PM
Exit mobile version