LockDown: ‘या’ देशातील पंतप्रधानांनीच मोडला नियम; भरावा लागला दंड

LockDown: ‘या’ देशातील पंतप्रधानांनीच मोडला नियम; भरावा लागला दंड

कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू असताना काही गोष्टींवर कडक निर्बंधदेखील घालण्यात आले आहेत. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, खोकणे, शिंकणे यावर बंदी घालण्यात आली आहे. तर धुम्रपान करण्यावरही निर्बंध आहेत. प्रामुख्याने इतर देशांमध्ये कोरोनामुळेच नव्हे तर एरव्हीदेखील या गोष्टी केल्यास दंड आकारला जातो. मात्र यातील एक प्रमुख नियम मोडल्यामुळे एका देशाच्या पंतप्रधानांना चक्क ४५ हजार रुपये इतका दंड भरावा लागला आहे.

हेही वाचा – संबंध ठेवता न आल्याने प्रियकर चवताळला आणि…

धुम्रपान केल्याने भरला दंड 

रोमानिया देशाचे पंतप्रधान लुडोविक ओरबान यांच्याबाबतीत हे घडले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या देशातही सार्वजनिक ठिकाणांवर धुम्रपान करण्यास मज्जाव आहे. मात्र पंतप्रधान काही मंत्र्यांसोबत धुम्रपान आणि मद्यपान करताना आढळून आले. शिवाय त्यांच्यात सोशल डिस्टन्सिंगचेही पालन झाले नसल्याचे दिसून आले. त्यांचे धुम्रपान करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्यामुळे स्वतःच बनवलेले नियम स्वतः मोडणाऱ्या पंतप्रधान लुडोविक यांना तब्बल ६०० डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार ४५ हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे फोटो पंतप्रधान लुडोविक यांच्या वाढदिवसा दिवशी म्हणजेच २५ मे रोजी घेण्यात आली होती. यामध्ये ते मंत्र्यांसोबत बसून धुम्रपान व मद्यपान करताना दिसत आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी त्यांनी मास्कदेखील परिधान केले नसल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंत रोमानियामध्ये १९ हजार १३३ कोरोनाबाधित आढळून आले असून तब्बल १ हजार २५९ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

First Published on: June 2, 2020 12:29 PM
Exit mobile version