लिंचिंगमध्ये सामील असलेले लोकं हिंदुत्व विरोधात – मोहन भागवत

लिंचिंगमध्ये सामील असलेले लोकं हिंदुत्व विरोधात – मोहन भागवत

आपली सेवा मिशनरींच्या सेवेपेक्षा खूप वेगळी आणि व्यापक आहे- मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)चे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी रविवारी सांगितले की, सर्व भारतीयांचे डीएनएन (DNA) एकच आहेत. मुस्लिम राष्ट्रीय मंचद्वारे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले. तेव्हा भागवत म्हणाले की, ‘सर्व भारतीयांचे डीएनए एकच आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असो. तसेच जे लिचिंगमध्ये लोकं सामील असतात ते लोकं हिंदुत्व विरोधातील आहेत आणि लोकशाहीत हिंदु किंवा मुसलमान वर्चस्व गाजवू शकत नाही.’

कार्यक्रमात पुढे भागवत म्हणाले की, ‘हिंदू-मुस्लिम ऐक्य भ्रामक आहे. कारण ते वेगळे नाही, पण एक आहे. पूजा करण्याच्या पद्धतीवरून लोकांमध्ये भेद असू शकत नाही. काही काम असे आहे, जे राजकारण करू शकत नाही. राजकारण लोकांना एकजुट करू शकत नाही. तसेच लोकांना एकजुट करण्याचे अस्त्र राजकारण बनू शकत आहे.’

‘आपण गेल्या ४० हजार वर्षांपासून त्याच पूर्वजांचे वंशज आहोत, हे सिद्ध झाले आहे. भारतीय लोकांचा डीएनए एक सारखा आहे. हिंदू आणि मुसलमान दोन गट नाही आहे. एकजुट होण्यासाठी काहीच नाही आहे, ते पहिल्यापासून एक साथ आहेत. आपण लोकशाहीमध्ये राहत आहोत. येथे हिंदु आणि मुसलमानांचे वर्चस्व असू शकत नाही. फक्त भारतीयांचे वर्चस्व असू शकते. देशात एकतेशिवाय विकास शक्य नाही. राष्ट्रवाद हा एकतेचा आधार असावा,’ असे मोहन भागवत म्हणाले.


हेही वाचा – RSS चे निकटवर्तीय, दोनदा आमदार, पाहा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामींची कारकिर्द


 

First Published on: July 4, 2021 10:04 PM
Exit mobile version