‘सबरीमाला मंदिरात येणाऱ्या महिलांवर RSS च्या कार्यकर्त्यांचा हल्ला’ 

‘सबरीमाला मंदिरात येणाऱ्या महिलांवर RSS च्या कार्यकर्त्यांचा हल्ला’ 

सबरीमाला मंदिर

केरळचे प्रसिध्द सबरीमाला मंदिर ५ वाजता खुले करण्यात आले मात्र मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नाकारण्यात आला. महिला प्रवेशावरुन मंदिर परिसरामध्ये तणावाचे वातावरण होते. मंदिराच्या पायथ्यापासूनच महिलांना रोखण्यात आले. मंदिर प्रशासनानेच महिलांना रोखून धरले होते. या घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण होते. महिलांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर दगडफेक केली. तर संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. यापूर्वी महिलांना मंदिराकडे जाण्यास मज्जाव करणाऱ्या आणि आंदोलन करणाऱ्या ५० आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

मंदिरपरिसरात १४४ कलम लागू

सबरीमाला मंदिरामध्ये जाणाऱ्या महिला भाविकांना मंदिराकडे जाणाऱ्या निल्लकल, पम्बा आणि एल्वाकुलम मार्गावर रोखण्यात आले होते. त्यामुळे तिथे तणावाचे वातावरण होते. याठिकाणी पोलिसांच्या आणि मीडियाच्या गाडीची तोडफोड करण्यात आली तसंच पत्रकार आणि पोलीसांवर हल्ला आणि दगडफेक करण्यात आली. त्यानंतर याप्रकरणाची दखल गृहमंत्रालयाने घेतली आहे. केरळच्या निल्लकल, पम्बा, एल्वाकुलम आणि सन्निधनम परिसरामध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

केएसआरटीसीच्या १० बसची तोडफोड

केरळ पोलिसांनी पांपा परिसरामध्ये उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. या परिसरामध्ये झालेल्या तणावानंतर केएसआरटीसीच्या बस सेवा रोखण्यात आल्या आहेत. आंदोलनकर्त्यांनी केएसआरटीसीच्या १० बसची तोडफोड केली. तर आंदोलनकर्त्यांनी सबरीमाला मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर दगडफेक केल्याने अनेक भाविक जखमी झाले आहेत.

आरएसएस-भाजपच्या लोकांनी केला हल्ला 

केरळचे मंत्री ई पी जयराजन यांनी या सर्व तणावामागे आरएसएसच्या लोकांचा हात असल्याचा आरोप केला आहे. सुप्रीम कोर्टाने केलेले नियम सर्वांना लागू होतात. केरळ सरकार त्याचे पालन करत आहे. आरएसएसच्या लोकांनी जंगलामध्ये लपून अयप्पा भक्तांवर हल्ला केला. १० मीडियाच्या पत्रकार, ५ भक्त आणि १५ पोलिसवाल्यांना जखमी केले असल्याचा आरोप जयराजन यांनी केला आहे.

१० ते १५ वयोगटातील महिलांना प्रवेश नाहीच

आंदोलनकर्त्यांनी सबरीमाला मंदिरात महिला विरोध केल्यानंतर मंदिर ५ वाजता उघडण्यात आले मात्र मंदिरात एकाही महिलेला प्रवेश देण्यात आला नाही. त्यानंतर मंदिरामध्ये पुजा आणि आरती करण्यात आली. आज रात्री १०.३० वाजेपर्यंत मंदिर भक्तांसाठी खुले राहणार आहे. तर २२ ऑक्टोबरपर्यंत म्हणजे पुढचे पाच दिवस मंदिर खले राहणार आहे. कोर्टाच्या आदेशानंतरही सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नाकारण्यात आला. १० ते ५० वयोगटातील एकही महिलेला मंदिरात येऊन दिले नाही.

First Published on: October 17, 2018 7:56 PM
Exit mobile version