Russia Ukraine War : ‘या’ देशाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना उघड पाठिंबा देत जगाला दिली धमकी

Russia Ukraine War : ‘या’ देशाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना उघड पाठिंबा देत जगाला दिली धमकी

गेल्या नऊ महिन्यापासून सुरु असलेले रशिया – युक्रेन युद्ध थांबवण्याचे नाव घेत नाही. यात आता युगांडाच्या लष्कर कमांडरने रशियाला जाहीर पाठिंबा दिला आहे. हा लष्कर अधिकारी कोणी सामान्य नाही, तर तो युगांडाच्या राष्ट्राध्यक्षांशी संबंधित आहे. रशियाने कोणतीही चुक केलेली नाही, त्यामुळे कोणत्याही देशाला घाबरण्याचे कारण नाही, असे लष्कर कमांडर मुहुजी केनेरुगाबा यांनी म्हटले आहे. रशियावरील हल्ला हा आफ्रिकेवरील हल्ला मानला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. नेमक संपूर्ण प्रकरण काय आहे जणून घेऊ…

युगांडाचे लष्करी कमांडर केनेरुगाबा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना अणुयुद्धाची धमकी देण्याची गरज नाही, आम्ही त्यांचे ऐकतो. रशियावर हल्ला म्हणजे आफ्रिकेवर हल्ला! सर्गेई लावरोव्हने जुलैमध्ये आफ्रिकेचा दौरा केला तेव्हा युगांडाचे अध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांना आश्वासन दिले की, जर रशियाने चुका केल्या असतील तर आम्ही त्यांना सांगू, परंतु त्यांनी कोणतीही चूक केली नसताना आपण त्याच्याविरोधात भूमिका घेऊ शकत नाही.

केनेरुगाबा हे युगांडाच्या राष्ट्रध्यक्षांचे पुत्र

केनेरुगाबा 1999 मध्ये युगांडाच्या सैन्य दलात दाखल झाले, यानंतर 2021 मध्ये त्यांची युगांडा पीपल्स डिफेन्स फोर्समध्ये कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते राष्ट्राध्यक्ष मुसेवेनी यांचे पुत्र आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे रशियाबाबतचे वक्तव्य थेट युगांडाची अधिकृत भूमिका मानली जात आहे. याआधीही युगांडातील आधीच्या सरकारमध्येही पाश्चात्य देशांपेक्षा रशियाला प्राधान्य दिले जात होते. रशियाकडून युगांडालाही लष्करी शस्त्रेही पुरवली जातात.

केनेरुगाबा यांनी केलेले हे विधान अशावेळी आले आहे जेव्हा डोनेस्तक आणि लुगान्स्क पीपल्स रिपब्लिक ( DPR आणि LPR) मध्ये सार्वमत घेतले जात आहे. खेरसन आणि झापोरोझ्ये रशियाच्या नियंत्रणाखाली आहेत जिथे लोकांनी मतदानात भाग घेतला. अशी शक्यता आहे की लवकरच रशिया त्यांना आपल्या देशाचा भाग म्हणून घोषित करू शकेल.


हिमाचलच्या कुल्लूमध्ये भीषण अपघात; बस दरीत कोसळल्याने 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 10 जखमी


First Published on: September 26, 2022 1:11 PM
Exit mobile version