Russia Ukraine War : ऐन युद्धातच पठ्ठ्याने उडवला लग्नाचा बार, युक्रेनियन मुलगी झाली भारताची सून, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Russia Ukraine War : ऐन युद्धातच पठ्ठ्याने उडवला लग्नाचा बार, युक्रेनियन मुलगी झाली भारताची सून, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन मधील युद्ध सध्या संपूर्ण जगासाठी चर्चेचा विषय बनला आहे. रशियाच्या सततच्या हल्ल्याने युक्रेनची परिस्थितीती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. एकीकडे रशिया युक्रेन युद्धाचा धुव्वा उडाला असताना दुसरीकडे एका पठ्ठ्याने थेट लग्नाचा बार उडवून दिला आहे. एका भारतीय मुलाने युक्रेनियन मुलीशी लग्न करत युक्रेनच्या लेकीला भारताची सून बनवलली आहे.  दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कपलने भारतात आल्यानंतर हैद्राबादमध्ये लग्नाची रिसेप्शन पार्टी केली. दरम्यान पंडितांच्या मदतीने लग्नाचे राहिलेले विधी उरकत युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध लवकरात लवकर संपावे यासाठी प्रार्थना देखील केली.

युक्रेनमध्ये राहणारी नवरी बीओ हुबोव हिने भारताच्या हैद्राबाद येथे राहणारा नवरा प्रतीक हालशी लग्नगाठ बांधली. दोघेही ज्या दिवशी युक्रेनहून भारतात परतले त्याच्या दुसऱ्या दिवशी युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात झाली. युक्रेनमध्ये असताच दोघांनी विवाह केला होता. तिथली परिस्थिती धोकादायक असल्याने दोघेही तात्काळ भारतात परतले.

 

भारतात आल्यानंतर प्रतीक आणि बीओ यांनी रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. यावेळी त्यांच्या लग्नाचे काही विधी पार पाडण्यासाठी चिलकुर बालाजी मंदिराचे मुख्य पूजारी सीएस रंगराजन उपस्थित होते. त्यांनी नवीन लग्न झालेल्या दाम्पत्याला आशिर्वाद दिले. त्याचप्रमाणे पंडित रंगराजन यांनी युक्रेनमधील युद्ध लवकरात लवकर थांबवण्यासाठी प्रार्थना केली.

या इंडो युक्रेनी कपलच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटो पाहणाऱ्या प्रत्येकाला त्यांची जोडी पसंतीस पडत आहे. प्रतीकचे आई वडील त्यांच्या युक्रेयिन सुनेला पाहून अत्यंत आनंदी आहेत. त्यांनी देखील सुनेच्या माहेरची म्हणजेच युक्रेनची परिस्थिती लवकरात सुधारावी यासाठी प्रार्थना केलीय. जेणेकरुन आपली सून पुन्हा माहेरी जाऊन तिच्या आई वडिलांना भेटू शकेल. मल्लिकार्जुन राव आणि पद्मजा असे प्रतीकच्या आई वडिलांचे नाव आहे.


हेही वाचा – Russia Ukraine War: युक्रेनमधील बॉम्बहल्ल्यात मृत्यू झालेला भारतीय विद्यार्थी कोण आहे?

First Published on: March 1, 2022 5:51 PM
Exit mobile version