Russia Ukraine War : पुतिन यांचा नवा क्रूर प्लॅन, युक्रेनियन नागरिकांना उघडपणे फाशी देण्याची आखली योजना

Russia Ukraine War : पुतिन यांचा नवा क्रूर प्लॅन, युक्रेनियन नागरिकांना उघडपणे फाशी देण्याची आखली योजना

Russia Ukraine War : पुतिन यांचा नवा क्रूर प्लॅन, युक्रेनियन नागरिकांना उघडपणे फाशी देण्याची आखली योजना

युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या 10 दिवसांपासून युद्ध सुरु आहे. रशियन सैन्य युक्रेनच्या अनेक महत्वाच्या शहरांना लक्ष्य करत आहेत. रशियाने आजवर युक्रेनमधील मोठ्या शाळा, हॉस्पीटल, लष्करी तळांवर मिसाईल हल्ले केले. तर युक्रेनमधील युरोपच्या अणुऊर्जा केंद्रावरही मोठा हल्ला केला. अशात रशियाने युक्रेनला पूर्णपणे संपवण्यासाठी एक नवा क्रूर प्लॅन आखला आहे. ज्यामाध्यमातून युक्रेनमधील नागरिकांचे मनोधैर्य कमी करण्याचे काम केली जाईल. रशियन सैन्याच्या या योजनेनुसार, युक्रेनियन नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांना सार्वजनिक फाशी देण्याची योजना आखत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, लीक झालेल्या कागदपत्रांवरून असे सूचित होते की, रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने युक्रेनियन नागरिकांचे मनोधैर्य खचवण्यासाठी शहरांमध्ये सार्वजनिकपणे फाशी देण्याची योजना आखली आहे.

रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने अत्यंत गंभीर आणि घातक योजना तयार केल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. यात नागरिकांचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न म्हणून रशिया युक्रेनियन शहरांमध्ये युक्रेनियन नागरिकांना उघडपणे फाशी देण्याची योजना राबवू शकतो.

या अहवालात असा दावा करण्यात आला की, अज्ञात युरोपियन गुप्तचर अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, युक्रेनियन निदर्शकांवर कारवाई करण्यासाठी रशिया सार्वजनिक फाशीची योजना राबवू शकतो. यातून युक्रेनियन नागरिकांचे मनोधैर्य खचवणे हा मुख्य उद्देश आहे. रिपोर्टर किट्टी डोनाल्डसन यांनी ट्विट केले की, युक्रेनियन नागरिकांचे मनोबल कमी करण्यासाठी एजन्सी हिंसक जमावावर आणि निदर्शकांवर दडपशाही करून त्यांना ताब्यात घेण्याची योजना तयार करत आहे.

युक्रेनमध्ये रशियाकडून सतत हल्ले सुरु आहेत. यात शुक्रवारी युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रावर रशियाने हल्ला केल्याची बातमी समोर आली. यामुळे आता जगभरात या युद्धामुळे चिंता व्यक्त होत आहे. रशियन सैन्याने युक्रेनच्या वेगवेगळ्या शहरांना लक्ष्य करत तेथील मोठ्या इमारती, शाळा आणि महत्वाच्या कार्यलयांना लक्ष्य केले. याच खेरसन शहर रशियाने ताब्यात घेतले. मात्र अनेक ठिकाणी आक्रमकांना युक्रेनमधील तीव्र प्रतिकाराचा सामना करावा लागतोय. त्यामुळे या विरोधकांना धडा शिकवण्यासाठी रशियाने हा क्रूर प्लॅन तयार केल्याचे बोलले जात आहे.


Russia Ukraine War : युक्रेनमधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिलासा; FMGE उत्तीर्ण झाल्यास भारतात इंटर्नशीप करण्याची परवानगी


First Published on: March 5, 2022 1:45 PM
Exit mobile version