Russia – Ukraine War: युक्रेन रशियाशी आता तह करण्यास तयार; झेलेन्स्की म्हणाले, नाटोच्या मैत्रीची गरज नाही

Russia – Ukraine War: युक्रेन रशियाशी आता तह करण्यास तयार; झेलेन्स्की म्हणाले, नाटोच्या मैत्रीची गरज नाही

Russia - Ukraine War: युक्रेन रशियाशी आता तह करण्यास तयार; झेलेन्स्की म्हणाले, नाटोच्या मैत्रीची गरज नाही

युक्रेन आणि रशिया यांच्यात गेल्या 32 दिवसांपासून युद्ध सुरु आहे. आजचा सोमवार हा युद्धाचा 33 दिवस आहे. रशियाकडून सातत्याने घातक बॉम्ब हल्ले सुरु आहेत. आत्तापर्यंत युक्रेनमधील सर्व महत्त्वाची स्थळे, कार्यालये, शाळा, हॉस्पीटल्स रशियाने उद्धस्त केलीत. अशा परिस्थितीत आता युक्रेन रशियाशी आता तह करण्यास तयार झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेन रशियाच्या सुरक्षेची हमी देण्यास तयार आहेत, तसेच तटस्थ राहून स्वतःला अण्वस्त्रमुक्त राज्य घोषित करू. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान हा सर्वात महत्त्वाचा विषय ठरत आहे.

तुर्कीतील इस्तंबूलमध्ये दोन्ही देशांचे प्रतिनिधी पुन्हा एकदा समोरासमोर बसून चर्चा करणार आहेत. मात्र या चर्चेपूर्वी अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्या अवास्तव मागण्यांपुढे ते झुकणार नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. यावर वोलोदिमीर झेलेन्स्की म्हणाले की, जर रशियाने डिनॅजिफिकेशन आणि निशस्त्रीकरणाची चर्चा केली तर आम्ही वाटाघाटीच्या टेबलावरही बसणार नाही. या गोष्टी आपल्या आकलनाच्या पलीकडच्या आहेत.

आतापर्यंत 28 फेब्रुवारी 1 मार्च आणि 7 मार्च रोजी रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता चर्चा झाली आहे, परंतु समेटाचा मार्ग सापडलेला नाही. सोमवारच्या बैठकीपूर्वी तुर्कीचे अध्यक्ष तैपेई एर्दोगन यांनी सांगितले की, दोन्ही देशांनी 6 पैकी 4 मुद्द्यांवर सहमती दर्शविली आहे, ज्यामध्ये युक्रेनने नाटोमध्ये सामील न होण्याच्या अटीचा समावेश केला आहे.

रशियाने युक्रेनवर अण्वस्त्र आणि जैविक शस्त्रे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला आहे. झेलेन्स्की यांनी हे आरोप मात्र नाकारले आहेत. ते म्हणाले की, ‘हा विनोद आहे, आमच्याकडे अण्वस्त्रे नाहीत. आमच्याकडे जैविक प्रयोगशाळा आणि रासायनिक शस्त्रे नाहीत. या गोष्टी युक्रेनकडे नाहीत.

झेलेन्स्कीच्या विधानांवरून असे देखील दिसते की, युक्रेनियन सैन्य आता रशियन हल्ल्यांमुळे खचले आहे, शस्त्रास्त्रांचा तुटवडा आहे आणि शस्त्राशिवाय कोणतेही सैन्य शत्रूशी स्पर्धा करू शकत नाही. अलीकडेच, राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, युक्रेन रशियाच्या क्षेपणास्त्रांचा प्रतिकार शॉटगन आणि मशीन गनने करू शकत नाही. विना टँक, सैनिकी वाहने आणि विशेषत: जेट्सशिवाय मारियुपोल वाचवणे आता शक्य नाही.


भारतावरील वीज संकट होणार दूर, 2023 पासून उभारले जाणार 10 अणुऊर्जा प्रकल्प


First Published on: March 28, 2022 9:28 AM
Exit mobile version