आधीच्या निर्णयाला स्थगिती नाही; मात्र पुनर्विचार याचिकांची सुनावणी घेणार

आधीच्या निर्णयाला स्थगिती नाही; मात्र पुनर्विचार याचिकांची सुनावणी घेणार

प्रातिनिधिक छायाचित्र

शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासंबंधी सुप्रीम कोर्टाने याआधी दिलेल्या निर्णयाला स्थगिता देणार नाही, असा निर्वाळा आज सुप्रिम कोर्टाने दिला आहे. मात्र या निर्णयाच्या विरोधात आलेल्या पुर्नविचार याचिकांची सुनावणी २२ जानेवारी रोजी घेण्याची तयारी सुप्रीम कोर्टाने दर्शवली आहे. मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या विरोधात ४९ पुर्नविचार याचिका दाखल झाल्या होत्या. २८ सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय देत देव आणि भक्तीसमोर लिंगभेद करता येणार नाही, असा निर्णय दिला होता. महिलांना समान अधिकार देण्यापासून वंचित ठेवता येणार नाही, असे कोर्टाने सांगितले होते. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायधीश दीपक मिश्रा यांनी हा निर्णय दिला होता.

मात्र परंपरेचा दाखला देत हजारो भाविकांनी पोलीस आणि माध्यमांना टार्गेट केले होते. भाविक आणि काही राजकीय नेत्यांनीही कोर्टाने परंपरेत दखल देऊ नये, असे म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले होते.

सुप्रीम कोर्टाच्या जुन्या निर्णयानंतर दोन वेळा शबरीमाला मंदिराचे दरवाजे उघडले गेले होते. मात्र भक्तांच्या प्रखर विरोधामुळे महिलांना मंदिरात प्रवेश करता आला नव्हता. पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था देऊनही महिला मंदिरात जाऊ शकल्या नव्हत्या.

 

First Published on: November 13, 2018 4:33 PM
Exit mobile version