शबरीमाला मंदिर बंद;’मीडियानं देखील निघून जावं’

शबरीमाला मंदिर बंद;’मीडियानं देखील निघून जावं’

अय्यप्पा भगवान आणि शबरीमाला मंदिर

शबरीमाला मंदिरामध्ये १० ते ५० वयोगटातील महिलांना दिलेल्या प्रवेशाच्या परवानगीवरून आता वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ५ दिवसांच्या पुजेनंतर आज शबरीमाला मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. कोर्टानं महिलांवरील प्रवेश बंदी उठवल्यानंतर आत्तापर्यंत ९ महिलांनी मंदिरामध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केले आहेत. पण प्रत्येक वेळी त्यांना भाविकांनी अडवून धरले. दरम्यान, प्रसारमाध्यमाच्या लोकांवर हल्ल्याची शक्यता लक्षात घेता त्यांनी  देखील निघून जावे असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान काहीही झाले तरी १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश देणार नाही अशी भूमिका भक्तांनी घेतली आहे. त्यावरून सध्या परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर भक्तांमध्ये संतापाची भावना आहे. शिवाय, आमच्या परंपरेमध्ये बाधा आल्यास मंदिर बंद ठेवले जाईल अशी भूमिका मंदिर प्रशासनानं घेतली आहे. तशा प्रकारचे पत्र देखील त्यांनी कर्नाटक सरकारला पाठवले आहे. दरम्यान, भाजपनं घेतलेल्या भूमिकेवरून देखील आता त्यांच्यावर चौफेर टिका केली जात आहे.

वाचा – का दिला जात नव्हता शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश?

कोर्टाच्या निर्णयानंतर नाराजी

१० ते ५० वयोगटातील महिलांवरील प्रवेश बंदी उठवल्यानंतर भक्तांनी आपला निषेध व्यक्त केला. मोर्चे देखील काढण्यात आले. यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय आहे. त्यानंसतर पत्रकारांवर देखील हल्ले झाले. वातावरण पाहता पोलिसांनी देखील पोलिस बंदोबस्तात वाढ केली. पण, त्यानंतर देखील भाविक आपल्या निर्णयावर ठाम राहिले. दरम्यान, काही महिलांनी मंदिरामध्ये प्रवेशाचा प्रयत्न केला खरा पण त्यामध्ये देखील त्यांना यश आलेले नाही. शबरीमालामध्ये महिलांना दिलेल्या परवानगीवरून मोठा गोंधळ झालेला पाहायाला मिळत आहे. भक्त देखील त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. काहीही झाले तरी आता माघार नाही अशी भूमिका भाविकांनी घेतली आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे. आम्हाला कोर्टाचा निर्णय मान्य नसल्याचे या भाविकांनी सांगितले आहे. दिवसेंदिवस हा वाद आणखी चिघळत आहे. त्यामुळे आगामी काळात सरकार आणि भाविक नेमकी काय भूमिका घेतात? याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

वाचा – शबरीमाला मंदिराचा निर्णय शिवसेनेला अमान्य; केरळमध्ये पुकारला ‘बंद’

वाचा – शबरीमाला मंदिर महिलांसाठी खुले; सुप्रीम कोर्टाचा आणखी एक मास्टरस्ट्रोक

First Published on: October 22, 2018 10:07 AM
Exit mobile version