सद्दाम हुसेनची ‘सोन्याची बोट’ पुन्हा जिवंत होणार!

सद्दाम हुसेनची ‘सोन्याची बोट’ पुन्हा जिवंत होणार!

सोन्याची बोट (फोटो सौजन्य -REUTERS)

इराणचा दिवंगत हुकूमशहा सद्दाम हुसेनची आलिशान बोट आता लवकरच एका आलिशान हॉटेलमध्ये रुपांतरीत होणार आहे. सद्दामने ही बोट बनवून घेतली खरी, पण त्याला त्याचा कधीच उपभोग घेता आला नाही. या बोटेची किंमत जास्त असल्यामुळे तिला कुणी खरेदीदारसुद्धा मिळत नव्हता. सद्दामच्या मृत्यूनंतर ही बोट सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीखाली धुळखात पडून होती.

सद्दाम पुसेनच्या बोट मधील आलिशान दिवाणखाना (फोटो सौजन्य -REUTERS)

‘बसरा ब्रीझ’
‘बसरा ब्रीझ’ नावाची सद्दाम हुसेनची ही बोट ‘सोन्याची बोट’ म्हणून ओळखली जाते. ही बोट ८२ मीटर लांब असून, त्यामध्ये तब्बल सतरा खोल्या, एक आलिशान अतिथी गृह आणि एक खास सलूनसुद्धा आहे. या बोटीतील बऱ्याच वस्तू सोन्यापासून बनवल्या आहेत. त्यामुळे त्याची किंमतही तेवढीच म्हणजेच तीन कोटी डॉलर आहे.

बोट मधील संग्रहालय (फोटो सौजन्य REUTERS)

बसरा ब्रीझचा इतिहास

१९८१ साली सद्दामने ही बोट डॅनिश शिपयार्डकडून खास बनवून घेतली होती. इराण आणि इराक यांच्यात बरेच वर्षे चाललेल्या युद्धामुळे सद्दाम हुसेनला त्याचा वापरच करता आला नाही. १९९० च्या कुवेत हल्ल्यानंतर ही बोट जॉर्डनकडे सुपूर्द करण्यात आली होती. तीन वर्षांच्या न्यायालयीन संघर्षानंतर २०१०मध्ये जॉर्डनकडून ही बोट इराणला परत मिळावण्यात यश आले.

या बोटीचे दोन्ही इंजिन अजूनही सुस्थितीत असून अगदी थोड्याशा दुरूस्तीनंतर ती वापरण्यासाठी तयार होऊ शकते, अशी माहिती या बोटीच्या देखभालीची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

बोट मधील कंट्रोल रुम (फोटो सौजन्य -REUTERS)
First Published on: May 25, 2018 7:57 AM
Exit mobile version