हिंदुत्व हे आयसिस, बोको हरामसारख्या जिहादी गटांसारखं- सलमान खुर्शिदांच्या पुस्तकावरून वाद

हिंदुत्व हे आयसिस, बोको हरामसारख्या जिहादी गटांसारखं- सलमान खुर्शिदांच्या पुस्तकावरून वाद

साधुसंत, ऋषीमुनी यांच्या परंपरेसाठी ओळखले जाणारे हिंदुत्व आक्रमक झाले आहे. हे हिंदुत्व आयसिस, बोको हरामसारख्या जिहादी गटांसारखेच काम करत आहे. अशा आशयाचा लेख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स, या पुस्तकात लिहण्यात आला आहे. यावरून भाजपने काँग्रेसलाच लक्ष्य केलं आहे.

‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स, या पुस्तकातील पान क्रमांक ११३ वरील द सॅफ्रॉन स्काय या प्रकरणातील लेखात खुर्शिद यांनी हे वाक्य लिहले आहे. यावरून भाजप नेते अमित मालविय यांनी टि्वट केले आहे. त्यात मुस्लीम मतांसाठी भगवा दहशतवादासारख्या कल्पना वापरणाऱ्या पक्षाच्या सदस्याकडून काय अपेक्षा करणार असा सवाल मालविय यांनी केला आहे.

तसेच खुर्शिद यांच्याविरोधात दिल्लीतील पोलीस ठाण्यात वकील विवेक गर्ग यांनी तक्रारही दाखल केली आहे. खुर्शिद यांनी हिंदुत्वाची प्रतिमा मलिन केली आहे. यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी यात करण्यात आली आहे.

First Published on: November 11, 2021 3:42 PM
Exit mobile version