“आधी तुमच्या सरकारमध्ये मंत्र्यांना किती मुलबाळं ते सांगा, माजी मंत्र्यांचा योगी सरकारला टोला

“आधी तुमच्या सरकारमध्ये मंत्र्यांना किती मुलबाळं ते सांगा, माजी मंत्र्यांचा योगी सरकारला टोला

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी विधेयक तयार केलं आहे. योगी सरकारनं आणलेल्या लोकसंख्या नियंत्रणाच्या विधेयकावरुन उत्तर प्रदेशमध्ये वादविवाद सुरु आहे. विरोधकांनी या विधेयकावर टीका केली आहे. काँग्रेस नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी योगी सरकारला तुमच्या सरकारमधील मंत्र्यांना किती मुलबाळं आहेत ते आधी सांगा असा सवाल करत टोला लगावला आहे. सरकारने आपल्या मंत्र्यांच्या मुलांबद्दल सांगूनच विधेयक मंजूर करावं अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे. योगी सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी आणलेल्या कायद्यात केवळ दोन मुलं असणाऱ्यांना सवलती दिल्या आहेत.

माजी मंत्री सलमान खुर्शीद यांनी म्हटल आहे की, लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्यापुर्वी सरकारने सांगितले पाहिजे की, त्यांच्या मंत्र्यांना मुल किती आहेत. पहिले त्यांनी घोषणा करावी आणि कायदा करावा तसेच खुर्शीद यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवर टीका केली आहे. ब्लॅक फंगस ऐकले आहे परंतु उत्तर प्रदेश सरकार राज्यातील जनतेसोबत काळी मजाक करत अशी खोचक टीका माजी मंत्री सलमान खुर्शीद यांनी केली आहे.

उत्तर प्रदेश मधील योगी सरकारने आणलेल्या लोकसंख्या नियंत्रण कायद्यामध्ये दोनपेक्षा जास्त मुल असणाऱ्या नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्याची परवानगी नसणार आहे. तसेच अशा नागरिकांना सरकारी नोकरीमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. पदोन्नती देखील सरकार देणार नसून इतर कोणत्याही योजनांचा लाभ मिळणार नसल्याचे म्हटलं आहे. उत्तर प्रदेश सरकार राज्यातील लोकसंख्या निवारण, स्थिरकरण आणि कल्याण यासाठी काम करत असल्यामुळे हा कायदा तयार करण्यात आला आहे.

First Published on: July 12, 2021 6:48 PM
Exit mobile version